डिझेल चोरी करणारी आंतरराज्य गुन्हेगारी टोळी जेरबंद; 15 लाख 22 हजार 058 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
बोरामणी द.सोलापूर येथील पेट्रोल पंपा मधुन डिझेलच्या चोरीच्या गुन्हयाची उकल

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- फिर्यादी सुमित शरणप्पा चिलोबा ( वय 32 व्यवसाय शिक्षक रा.महर्षी नगर बनशंकर मंदिरा जवळ शेळगी सोलापूर ) यांच्या काकाच्या मालकीचे बोरामणी ता.द.सोलापूर येथील शिवारातील शिवसुंदर चिलोबा एच.पी.सी.एल. या पेट्रोल पंपाच्या डिझेलच्या टाकीतुन 4 लाख 63 हजार 800 रूपये किंमतीचे 5000 लिटर डिझेल अज्ञात चोरटयांनी चोरून नेले आहे वगैरे मजुकरांच्या फिर्यादी वरून सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस गुरनं 212/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे दि.2.4.2023 रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर याचेकडे देण्यात आला होता.
गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे वर नमूद गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे मागावर असताना त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदार करवी सदरचा गुन्हा हा तेरखेडा जि. धाराशिव (उस्मानाबाद) येथील 7 संशयित इसमांनी केला असून ते बसवकल्याण, कनार्टक येथे असल्याची बातमी मिळाली होती.
मिळालेल्या बातमीनुसार डी.बी.पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संशयित इसमाचा बसवकल्याण राज्य कनार्टक येथे जाऊन शोध घेऊन तपास केला तेथे मिळालेल्या बातमी मधील नमूद वर्णनाचे 7 संशयित इसम त्यांना मिळुन आले. त्या सर्वांना गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन त्या सर्वांकडे विचारपूस करता त्या सर्वांनी सुरूवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करून तपास केला असता त्या सर्वांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्या सर्वांना गुन्हयाचे तपासकामी अटक करून मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर नं.9 यांचे न्यायालयात हजर करून त्या सर्वांची वेळोवेळी मा.न्यायालयांकडुन वेळोवेळी पोलीस कस्टडी घेऊन त्याचेकडे तपास केला आहे.
पोलीस कस्टडी मधील आरोपी यांचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या डिझेलची वाहतुक करणे करीता वापरण्यात आलेला 14 लाख रूपये किंमतीचा एक मालट्रक, चोरी केलेल्या डिझेल पैकी 1 लाख 398 रूपये किंमतीचे 1050 लिटर डिझेल प्लॅस्टिक कॅन्डसह, 15 हजार रूपये किंमतीचे मोबाईल हॅन्डसेट, डिझेलची चोरी करणे करीता वापरलेल्या 6660/-रूपये किंमतीचे साहित्या पैकी हॅन्ड पंप, प्लॅस्टीक पाईप, वायर, स्वीच बोर्ड, पक्कड, स्क्रु ड्रायव्हर, काळया रंगाची चिकटपट्टी, प्लॅस्टीक कॅन्ड असा एकूण 15लाख 22 हजार 058 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चोरीस गेलेले उर्वरित डिझेल निष्पन्न संशयित आरोपी यांनी कोणास विक्री केली या अनुषंगाने त्याचेकडुन माहिती घेतली असून त्याप्रमाणे गुन्हयाचा तपास करून ते हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेस कार्यरत असलेले श्री.सूरज निंबाळकर, पोलीस उप-निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील आरोपी यांचे विरूध्द कर्नाटक राज्यातील नेसर्गी, रामदुर्ग व अतनी पोलीस ठाणेस पेट्रोल पंपातील डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील सुरज निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक, पोहवा/संजय देवकर, पोना/शशीकांत कोळेकर, सुनिल कुंवर, पोलीस अंमलदार/ पैंगबर नदाफ, फिरोज बारगीर, महादेव सोलकंर, वैभव सुर्यवंशी व सायबर पोलीस ठाणे कडील पोना/व्यंकटेश मोरे, पोलीस अंमलदार धीरज काकडे यांनी बजावली आहे.
0 Comments