Hot Posts

6/recent/ticker-posts

एथर इलेक्ट्रिक बाईक डीलरशिपचा उद्या होणार थाटात शुभारंभ...

 एथर इलेक्ट्रिक बाईक डीलरशिपचा उद्या होणार थाटात शुभारंभ...

चव्हाण उद्योग समूहाच्या शिरपेचात एथरचा मानाचा तुरा

पश्चिम महाराष्ट्रातील पहिले इ-बाईकचे शोरूम; मोफत चार्जिंग स्टेशन उपलब्ध

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चव्हाण उद्योग समूहाच्या माध्यमातून आजपर्यंत सोलापूर शहरामध्ये लुना मोपेडपासून सुरू झालेला हा प्रवास मोटोकॉर्प, रॉयल एनफिल्ड (बुलेट), मारुती सुझुकी, टाटा मोटर्स या वेगवेगळ्या वाहनांच्या डिलरशिप घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये एथर इलेक्ट्रिक बाईकच्या डिलरशिपचा शुभारंभ १७ मार्च रोजी होटगी रोड येथील सुसज्ज शोरूममध्ये सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता होणार आहे, अशी माहिती चव्हाण मोटार उद्योग समूहाचे बाबू ऊर्फ शिवप्रकाश चव्हाण, घनःश्याम चव्हाण यांनी दिली. 

या उद्घाटन समारंभास 'एथर' कंपनीचे झोनल हेड आशिष शर्मा, रिजनल हेड अलेक्स, टेरिटरी मॅनेजर शशांक बिराजदार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एथर गाडीचे इतर गाड्यांपेक्षा एक वेगळे वैशिष्ट्य आहे. या गाडीमध्ये ई-सीम कनेक्टिव्हिटी, ऑन बोर्ड गुगल नेव्हिगेशन देण्यात आले आहे. या गाडीची भरपूर क्षमतेची बॅटरी असून, पाच वर्षाची या बॅटरीची वॉरंटी आहे. ही गाडी प्रतितास ९० किलोमीटर वेगाने धावू शकते. फुल बॅटरी चार्ज केल्यानंतर १४६ किलोमीटर अंतर पार करू शकते. सध्या पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे या इलेक्ट्रिक गाड्या ग्राहकांना परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती वाढत आहे. 'एथर' ची ही स्कूटर अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.


एथरच्या गाड्या सहा रंगांत उपलब्ध

सोलापूरमध्ये नव्याने दाखल होत असलेल्या एथर या इलेक्ट्रिक बाईक चव्हाण उद्योग समूहाच्या होटगी रोड येथील शोरूममध्ये सहा रंगांमध्ये उपलब्ध आहेत. मारुती आणि नेक्सामध्ये गेली सात वर्षे सलग अतिशय प्रतिष्ठित अशी रॉयल प्लॅटिनम श्रेणी आणि अल्फा श्रेणी चव्हाण उद्योग समूहाने मिळवली आहे. प्रत्येक ग्राहकाची आस्थेवाईक चौकशी, विनम्र सेवा यामुळे आम्ही हे यश संपादन केले असल्याचे चव्हाण बंधूंनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments