मुंबई (कटूसत्य वृत्त):- मंत्रालय आणि विधिमंडळात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची सर्वंकष उच्च दर्जाची आरोग्य तपासणी विधिमंडळाचे अधिवेशन संपताच केली जाईल असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या प्रतिनिधींना दिले.
कोरोनानंतर विविध आजारांमध्ये झालेली वाढ, यात अनेक पत्रकारांचा बळी जाणे ही बाब वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. पत्रकारांवरील आरोग्याचे संकट गंभीर असल्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी मान्य केले. आरोग्य विभागाकडून मंत्रालयातील पत्रकारांसाठी दोन दिवसांचे सर्वंकष आरोग्य शिबीर आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच विधान भवनात हे शिबिर आयोजले जाईल, असे मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
0 Comments