पंढरपूर अर्बन बँकेचे गिरीश बोरखेडकर यांचे क्रेडिट प्रोफेशनल परीक्षेत यश
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर अर्बन बँकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत असणारे श्री.गिरीश वसंतराव बोरखेडकर हे नुकतीच सर्टिफाइड् क्रेडिट प्रोफेशनल (क्रेडिट ऑफिसर) ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (आयआयबीएफ) या देशातील मानांकित संस्थेतर्फे बँकर्ससाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेनंतर आयआयबीएफचे प्रशिक्षण केंद्राअंतर्गत मुंबई येथे प्रत्यक्ष तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले जाते.
यापूर्वी बँकिंग क्षेत्रातील जे.ए.आय.आय.बी. आणि सी.ए.आय.आय.बी. परीक्षा ही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले होते, तसेच त्यापुढील सी.ए.आय.आय.बी.चे को-ऑपरेटिव्ह बँकिंग परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये श्री.बोरखेडकर यांनी यश संपादन केले होते.
या यशाबद्दल पंढरपूर अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख, मार्गदर्शक मा.आमदार प्रशांतराव परिचारक, बँकेचे चेअरमन श्री.सतीशजी मुळे, व्हा.चेअरमन सौ.माधुरीताई जोशी, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे, कर्मचारी वर्ग यांचेकडून अभिनंदन केले जात आहे.
0 Comments