Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री शारदेय गुरुकुल मध्ये पूर्व प्राथमिक स्तराचा पदवीदान सोहळा उत्साहात पार...

श्री शारदेय गुरुकुल मध्ये पूर्व प्राथमिक स्तराचा पदवीदान सोहळा उत्साहात पार...

             टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री लक्ष्मणराव देशमुख (गुरुजी) बहुउद्देशीय सार्वजनिक संस्था संचलित श्री शारदेय गुरुकुल पब्लिक  स्कूल टेंभुर्णी येथे शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ रोजी पूर्व प्राथमिक विभागातील (सिनियर केजी) मोठ्या गटाच्या  विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला . 

             या  कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ठीक १२:०० वाजता झाली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टेंभुर्णी पंचक्रोशीतील प्रसिद्ध इंजिनिअर आशुतोष काटकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक सुरज भैय्या देशमुख हे उपस्थित होते.

             या पदविदान समारंभावेळी विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य  प्रस्तुत केले.यानंतर प्रमुख पाहुणे अशितोष काटकर यांनी चिमुकल्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला .उपस्थित असलेल्या पालकांसोबत त्यांच्या पाल्याचा सन्मान करण्यात आला. 

             संचालक सुरज देशमुख व स्कुलच्या प्रिन्सिपल शाहिदा पठाण मॅडम यांनी चिमुकल्यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अवचित्य साधून 

             प्रशालेने खास चिमुकल्या पदवीधरांसाठी पोस्टर पेंटिंगचे आयोजन केलेले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे चित्र रंगवले.

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणी मिस यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सिनिअर के. जी. च्या क्लास टीचर सारिका अनंतकवळस तसेच पूर्वप्राथमिक विभागातील इतर शिक्षक तसेच म्युझिक टीचर ओमगीर यांचा मोलाचा वाटा होता. एकूणच कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये  यशस्वीरित्या संपन्न झाला.

Reactions

Post a Comment

0 Comments