Hot Posts

6/recent/ticker-posts

कै. शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर येथे क्रीडा स्पर्धांचे संपन्न...! 

कै. शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर येथे क्रीडा स्पर्धांचे संपन्न...! 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने भविष्यात देशाला दर्जेदार खेळाडू देण्याच्या विचारधारेतून अनगर येथील कै शंकरराव बाजीराव पाटील विद्यालयात जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.
तालुकास्तरीय खो. खो. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव तथा सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अनेक शाळेंनी व स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्यात आला आहे. 
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अजिंक्यराणा पाटील यांनी सर्व खेळाडूंना विजयासाठी प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या.
पाठीवर शुभेच्छा आणि कौतुकाची थाप पडल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा बहारदार खेळ केल्याचे दिसून आले.
याप्रसंगी शिक्षक जिल्हा पतसंस्थेचे संचालक संभाजी चव्हाण, प्राचार्य चंद्रकांत ढोले, कोरवलीचे कोळेकर, आष्टीचे मते, पेनुरचे शिंदे, मोहोळचे सोनवणे व महादेव माने गुरुजी आधीसह कै. शंकरराव बाजीराव पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोहोळ तालुक्यातील खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments