बेरोजगार उमेदवारांसाठी 29 डिसेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 21, 2022

बेरोजगार उमेदवारांसाठी 29 डिसेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन

 बेरोजगार उमेदवारांसाठी  29  डिसेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचे मार्फत दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला  असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली  .


या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, ट्रेनी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, एम.एस.डब्ल्यु., एम.बी.ए., ऑफिस असिस्टंट, बी.एस.सी., एम.एस.सी. बी.कॉम. कोणतीही पदवी, टेलिकॉलर, ट्रेनी, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशीय अशा प्रकारची एकुण 925  पेक्षा जास्त रिक्तपदे 6 उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अधिसुचीत केलेली आहेत.


नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दुरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जाधव यांनी  केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages