मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ हा तालुका आजवर विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेला तालुका..
मागच्या पाच वर्षापासून मोहोळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाल्यामुळे मोहोळचा चेहरा मोहरा बदलेल.
मोहोळ मध्ये विकासाची गंगा पोहोचेल. अशी आशा मोहोळकरांना लागून राहिली होती.
परंतु गेल्या पाच वर्षात मोहोळ शहराचा विकास म्हणावा तसा झाला नसल्यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे.
त्याच धर्तीवर मोहोळ शहराचा विकास आराखडा नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
मोहोळ शहराची लोकसंख्या चौफेर वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता या आराखड्यात बऱ्याच त्रुटी आढळून येत असल्यामुळे हा आराखडा बदलण्याची गरज असल्यास निवेदन नगरसेविकास सीमा पाटील यांनी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिले.
मोहोळ शहराच्या चारी दिशांना येल्लो झोन होणे आवश्यक आहे.
मोहोळ ते पंढरपूर रोड मोहोळ ते पुणे रोड मोहोळ ते वैराग रोड मोहोळ ते विजापूर रोड या बाजूला येलोझोन वाढवलेला नाही.
फक्त मोहोळ ते सोलापूर हा रस्ताच फक्त येलो झोन मध्ये दिसून येतोय.
सर्व ठिकाणी येलोझोन झाल्यास शहराचा भविष्यात चौफेर विकास झालेला दिसून येईल त्याचप्रमाणे रिंग रोड हा शहरातून गेल्यास नागरिकांच्या आणि शाळकरी मुलांच्या जीवित आला फार मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शहरातून जाणारा रिंग रोड रद्द करून शहराच्या बाहेरून रिंग रोड करावा.
अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा नगरसेविका सीमा पाटील यांनी दिला आहे.
0 Comments