Ads

Ads Area

जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेत महात्मा फुले स्मृतिदिन अर्थात शिक्षक दिन मोठ्या उत्साही साजरा 

जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेत महात्मा फुले स्मृतिदिन अर्थात शिक्षक दिन मोठ्या उत्साही साजरा 
कोंडी (कटूसत्य वृत्त):- जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल आणि राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कोंडी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही 28 डिसेंबर महात्मा फुले स्मृतिदिन अर्थात शिक्षक दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांच्या हस्ते प्रतिमापूजन कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली भाषणे केली.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होत.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणेश निळ म्हणाले की, ज्या काळामध्ये पुरोहित मंडळींनी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये मुलींना शिकण्याचा अधिकार नाकारला होता.
त्याच काळामध्ये पुणे शहरात आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवून मुलींसाठी शिक्षणाचे दार खुले करणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य निश्चितच समाजाला प्रेरणा दायक आहे.
त्यामुळे त्यांचा स्मृतिदिन हाच शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होणे गरजेच्या असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड मोठा त्याग करून स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केल्यामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकल्या. अंतराळवीर होऊ शकल्या.
परंतु या कामाची मुहूर्तमेढ प्रथम फुले दांपत्याने रोवली असल्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला सर्वांनी सलाम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना शेवटी सांगितले.
बालविवाह, अस्पृश्यता, विधवा विवाह, सती प्रतीच्या विरोधात आणि जाती भेद नष्ट करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.
महात्मा गांधीजी यांनी सुद्धा खरा महात्मा ज्योतिबा फुले आहेत असं पुण्यात येऊन स्पष्टपणे सांगितल्यामुळे महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी कार्याची ओळख आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सुवर्ण माने यांनी केले.
यावेळी प्रा दादासाहेब नीळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . 
प्राचार्य सुषमा नीळ यांनी शिक्षक दिन या विषयावर विचार प्रकट केले.
पूर्ण एक दिवस इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम केले. शिक्षकी पेशा कसा असतो हे दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस प्रत्यक्ष अनुभव घेतला.
मुख्याध्यापक म्हणून आर्यन व्यवहारे या विद्यार्थ्याने अतिशय चांगल्या प्रकारचे काम केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून संकुलामध्ये यावेळी विविध स्पर्धा सुद्धा पार पडल्या.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अर्चना औरादे, वैभव मसलकर, स्वप्निल शिंदे, महादेवी माने, मंजुषा सुरवसे, एस पी काटे, आसमा सय्यद, प्राजक्ता पाटील, अश्विनी नीळ, मीरा माने, तेजश्री कुलकर्णी, मोनिका दायमा, माऊली भोसले आधी सहशिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close