Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी सैनिकांच्या पाल्यांनी वसतीगृहासाठी अर्ज करण्याचे आवाहन

माजी सैनिकांच्या पाल्यांनी वसतीगृहासाठी अर्ज करण्याचे आवाहन

               सोलापूर (कटुसत्य वृत्त):- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृहासाठी माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने केले आहे. अर्ज करण्याची मुदत 15 जुलै 2022 पर्यंत आहे.

               सोलापूर / इतर जिल्हयातील माजी सैनिकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सोलापूर शहरात येणाऱ्या मुलां/मुलींची माफक दरात राहण्याची व जेवणाची सोय व्हावी, यासाठी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे वतीने व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूरचे अंतर्गत सोलापूर शहरात सुंदरम नगर, शासकीय आयटीआयच्या पाठीमागे, विजापूर रोड सोलापूर येथे सैनिकी मुलांचे/मुलींचे प्रत्येकी एक वसतीगृह चालविण्यात येत आहे. प्रत्येक वसतीगृहाची विद्यार्थी क्षमता 50 पन्नास इतकी असून माजी सैनिकांच्या मुलां/मुलींना माफक शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो.

               तसेच युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना विनाशुल्क प्रवेश दिला जातो. वसतीगृहामध्ये मुलां/मुलींची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. वसतीगृहामध्ये प्रवेश घेणेसाठी सैनिकी मुलां/मुलींचे वसतीगृह व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे प्रवेश पुस्तिका व अर्ज उपलब्ध आहेत.

               शैक्षणिक वर्ष 2022 - 2023 साठी वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी कोव्हीड-19 ची दुसरी लस घेतलेल्या पाल्यांचे त्यांच्या पालकाच्या सहमती पत्रासह अर्ज 15 जुलै 2022 पर्यंत स्विकारले जातील. तरी माजी सैनिकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाच्या सोयीसाठी या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी कळविले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments