सांगोला ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांमध्ये लुटारू संस्थाचालकांचा महाप्रताप, शिक्षकांकडून वसूल केली जातेय हप्तेखोरी

सोलापूर (कटुसत्य वृत्त): सांगोला तालुक्यातील अनेक गावातील माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकांकडून संस्थाचालक "देणगी"या गोंडस नावाखाली हजारो रुपये दरवर्षी उकळत असल्याचा प्रकार तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमधून उघडपणे जोर धरत असल्याची चर्चा शिक्षकवर्गातून उघडपणे बोलली जात आहे. संस्थाचालक मात्र स्वतःच्या अविर्भावात असून शिक्षकाने हप्ता नाही दिला तर त्याला मानसिक, शारीरिक त्रास देण्यासाठी डाव आखत असल्याचे ही निदर्शनास येत आहे.शिक्षकाची मानसिक कुचंबना करण्यासाठीं नवीन नवीन षढयंत्र रचत असल्याचे निदर्शनास येत आहे. या वर नियंत्रण ठेवणारा शिक्षण विभाग मात्र "तेरी भी चूप मेरी भी चूप"या भूमिकेत असून शिक्षणाधिकारी भास्कर बाबर मात्र चिडीचूप आहेत.शिक्षक मात्र दरवर्षीच्या हप्तेखोरीला वैतागून नैराश्याचे जीवन जगत असल्याचे वास्तवदर्षी चित्र या शाळेतील शिक्षकामध्ये पहावयास मिळत आहे.
मुळातच कायद्यामध्ये कुठेही संस्था देणगी अथवा विद्यार्थी विकासासाठी शिक्षकाकडून शिक्षकाच्या पगारातून ठराविक रक्कम वसूल करावेत,असे निर्देश नसताना हे शिक्षण क्षेत्रातील दरोडेखोर मात्र बिनदिक्कतपणे शिक्षकाच्या मानगुटीवर बसून शिक्षकांच्या पगारावर डोळा ठेवून टपलेले असतात.विद्यार्थी विकासापेक्षा शिक्षकाकडून पैसे कसे वसूल करावेत?.हाच विचार संस्था चालकाच्या मनात घोळत असतो.
खाजगी शाळांना संस्था विकासासाठी वेतनेतर अनुदान मिळत असताना संस्था चालक मात्र शिक्षकाकडून पैश्याची मागणी करीत आहेत.शिक्षण कलम 1950 कलम 41 (D) प्रमाणे शिक्षकाकडून संस्थाचालक त्याच्या मर्जी विरूध्द पैसे घेत असल्यास संस्थेची मान्यता रद्द केली जाते.पण यांची गांभीर्यता संस्था चालक घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. आणि ही गांभीर्यता का घेत नाहीत?हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
येणाऱ्या काळात संस्था चालकाच्या विरोधात काही शिक्षक बंडाच्या पावित्र्यात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तर काही शिक्षक मात्र हप्ते खोरीस वैतागून आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचेही विचार बोलून दाखवित आहेत. तालुक्यातील हप्तेखोरीसाठी शिक्षणसंस्थेत जर शिक्षकांना त्रास झाला तर अशा शिक्षण संस्थेच्या आणि शिक्षण चालकाच्या विरोधात राज्यभर विविध शिक्षण संघटना धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करून संस्थेची मान्यता रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एका शिक्षणतज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. अशा संस्था चालकाच्या विरोधात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मिळून मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.
0 Comments