श्री विठ्ठल परिवाराच्या अस्तित्वाची लढाई - कल्याणराव काळे

पंढरपूर (कटुसत्य वृत्त): श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारा दरम्यान चेअरमन श्री कल्याणराव काळे हे पुळूज, गुरसाळे व पट.कुरोली येथील प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी बोलतांना चेअरमन श्री कल्याणराव काळे म्हणाले की, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ही निवडणुक विठ्ठल परिवाराच्या अस्तित्वाची निवडणूक असून हा परिवार गेल्या 25 वर्षापासून एकसंघ राहिलेला आहे, काही विरोधक पॅनलप्रमुख विठ्ठल परिवारामध्ये फुट पाडण्याचे काम करीत आहेत. आपला परिवार एकसंघ रहावा म्हणून आम्ही श्री युवराज पाटील यांना 5 वर्षासाठी चेअरमन करण्याचे ठरविले होते, असे असतांना देखील त्यांच्या बगल बच्यांनी या निवडणूकीत परिवार एकसंघ राहू नये याची काळजी घेण्याचे पाप केले. त्यामुळे अशा विरोधकांना आता सभासदांनी खड्यासारखे बाजुला करावे असे आवाहन चेअरमन श्री कल्याणराव काळे यांनी केले.
गेल्या 6 महिन्यापासून आम्ही खा.श्री धनंजय महाडिक यांना घेऊन पुणे, मुंबई येथे खा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, मा.उप मुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब, मा.सहकार मंत्री मा.श्री बाळासाहेब पाटील व माजी मंत्री श्री जयंतराव पाटील साहेब यांचेकडे 35 ते 40 वेळा सभासदांच्या ऊस बिलासाठी व कारखाना सुरू करणेसाठी प्रयत्नशिल होतो. परंतु श्री युवराज पाटील व त्यांच्या बगलबच्यांनी मात्र मा.साखर आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर व मा.उच्च न्यायालय, मुंबई अशा ठिकाणी तक्रारी दाखल करून वेगवेगळ्या पध्दतीने अडचणी निर्माण केल्या. दि.4 जुलै, 2022 रोजी साखर विक्री होऊन विठ्ठल कारखान्याच्या सर्व सभासदांची ऊस बिले त्यांचे बँक खातेवर जमा होतील असे चेअरमन श्री कल्याणराव काळे यांनी सांगितले.
यावेळी मनसे नेते श्री दिलीप धोत्रे व दोन्ही कारखान्याचे आजी माजी संचालक सर्वश्री मोहन कोळेकर, उत्तम नाईकनवरे, दशरथ खळगे, हणमंत पवार, नेताजी सावंत, राजाराम बाबर, धनाजी घाडगे, दत्तात्रय चौगुले, होनकळस, मच्छिंद्र नायकुडे, समाधान जगताप, भारत पाटील, किसन जाधव, शेख, आबा पुजारी, नंदकुमार पाटील, निरंजन कोळेकर, सुधाकर कवडे, मारूती जाधव, नंदू उपासे, बंडू पवार यांचेसह विठ्ठल परिवाराचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद बांधव उपस्थित होते.
0 Comments