एकनाथ शिंदे शिवसैनिक असल्याचं सारखं का सांगावं लागतंय? अजितदादांनी फटकारलं

मुंबई (कटूसत्य वृत्त):- एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असा कुणीच विचार केला नव्हता. फडणवीस हे सारखे शिवसैनिक शिवसैनिक म्हणून सांगण्याची वेळ का येत आहे. शिवैनिक आहे तर सारखं का सांगत आहात.याचा कुठे तरी विचार झाला पाहिजे, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीस यांच्या भाषणाचा समाचार घेत जोरदार टोलेबाजी केली. 'एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असा कुणीच विचार केला नव्हता.
फडणवीस हे सारखे शिवसैनिक शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत आहे. हे सांगण्याची वेळ का येत आहे. शिवसैनिक आहे तर सारखं का सांगत आहात. याचा कुठे तरी विचार झाला पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांनी 30 तारखेला शपथ घेतली.तुम्हाला राज्यपालांनी 4 तारखेला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. तुम्ही तो बहुमत सिद्ध केला आहे. 'सत्ता येते आणि सत्ता जाते, कुणी ताम्रपट घेऊन जन्माला घेऊन आलेलं नाही. एकनाथ शिंदे यांचं इतकं कौतुक करत होता.
त्यांना फडणवीस सरकारच्या काळात फक्त एकच मंत्रिपद दिलं होतं. तुम्ही त्यावेळी त्यांना रस्ते आणि महाविकास महामंडळ हे खाते दिले होते. जनतेशी संबंधित एकही खाते दिले नव्हते. एवढं शिंदेंचं कौतुक करताय तर त्यावेळी मंत्रिपद का दिली नाही.खरं तर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, 11 तारखेला सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. पण, त्याआधी तुम्ही बहुमताची चाचणी घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ठराव इतक्या घाईने आणण्याची गरज नव्हती.
राज्यपालांनी लगेच ठराव मंजूर केले. शिंदे साहेब आपण दोघे जण राजभवनावर जात होतो. त्यावेळी ते आपल्याला थांबवून ठेवायचे. पण आता सरकार बरखास्त झाल्यानंतर राज्यपाल एकदम अॅक्शन मोडमध्ये आले आहे.सगळी कामं जोरात सुरू आहे. अध्यक्षपदाची निवडही तातडीने झाली आहे, असंही अजित पवार म्हणाले. शिवसेनेचे आमदार फुटले, आज 40 आमदार झाले आहे. या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास दाखवून बाहेर पडले.
त्यामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्याचे परिणाम तुम्हाला काय दिसतील हे मतदारसंघात पाहण्यास मिळतील. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना उभा केली. ज्या ज्या वेळी बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, भुजबळांनी 18-19 आमदार घेऊन शिवसेना फोडली त्यानंतर निवडणुकीमध्ये एकही आमदार निवडून आला नाही. नारायण राणेही बाहेर पडले होते. त्यावेळीही आमदार निवडून आले याचा आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करावे लागेल. संदीपान भुमरे यांनी मिर्ची झोंबले पाहिले असं कार्यकर्त्याला पाठवला सांगितलं, आपण मंत्रिमंडळात होतो आता काय बोलताय, असा टोलाही अजितदादांनी लगावला.
0 Comments