Hot Posts

6/recent/ticker-posts

महिला काँग्रेसचा मुंबईतील ED कार्यालयावरील मोर्चाचा फियास्को,आंदोलकांपेक्षा पोलीस-पत्रकारांचीच संख्या जास्त

 महिला काँग्रेसचा मुंबईतील ED कार्यालयावरील मोर्चाचा फियास्को,आंदोलकांपेक्षा पोलीस-पत्रकारांचीच संख्या जास्त

मुंबई (कटूसत्य वृत्त):- काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी  यांना नॅशनल हेराल्ड  प्रकरणी ईडीने समन्स बजावला आहे. पण त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दुसरीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस 30 तास चर्चा करण्यात आली. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीच्या या चौकशीवरुन देशात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या ईडी चौकशीला विरोध करण्यात येतोय.

देशभरात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांप्रमाणे मुंबईतीलही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तर ईडीवर  मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या मोर्चाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. पण काँग्रेसचे ईडीवरील आक्रमक मोर्चाचे सर्व दावे फोल ठरले.

महिला काँग्रेसचा ईडीवरील मोर्चाचा फियास्को झाला. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करण्यासाठी मुंबईत महिला काँग्रेसचा आज दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयावर मोठा मोर्चा निघणार होता. या मोर्चाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. या मोर्चाचा गाजावाजा पाहता पोलीसही सतर्क झाले होते.

त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पण मोर्चाचा ठरवलेला वेळे निघून 2 तास झाले तरी महिला जमेनात. मोर्चाच्या ठिकाणी आंदोलकांपेक्षा पोलीस आणि पत्रकारांची संख्याच जास्त होती. विशेष म्हणजे या मोर्चाकडे काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवलेली दिसली.

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एकही नेता या आंदोलनात सहभागी झालेलं दिसलं नाही.मोर्चासाठी महिला जमेनात म्हणून जमलेल्या 20 ते 25 महिलांनी घोषणाबाजी करत मोर्चाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि ईडीच्या कारवाई विरोधात घोषणाबाजी केली. महिला काँग्रेसने ईडी कार्यालयावर घेराव घालणार, असा दावा केला होता.

पण सर्व दावे फोल ठरले . महिला प्रदेश काँग्रेस मोर्च्यात सहभागी व्हायला कार्यकर्त्याच नव्हत्या. अखेर असलेल्या महिलांसह घोषणाबाजी करत कार्यकर्त्या निघाल्या. या सर्व आंदोलक महिलांना लगेच पोलिसांनी रोखलं. त्यानंतर मोर्चा आटोपला. महिला काँग्रेसचा मोर्चाचा हा स्टंट अवघ्या 10 मिनिटात आटोपला.

Reactions

Post a Comment

0 Comments