Hot Posts

6/recent/ticker-posts

चिंतामणी विद्यालयात २००६ बॅचचा विद्यार्थी शिक्षक मेळावा उत्साहात सपन्न

 चिंतामणी विद्यालयात २००६ बॅचचा विद्यार्थी शिक्षक मेळावा उत्साहात सपन्न


थेऊर ( प्रविण शेंडगे ) : आज चिंतामणी विद्या मंदिर, थेऊर येथे इयत्ता दहावी (2006 बॅच) चा विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा पार पडला.. ज्या शाळेने आम्हा विद्यार्थ्यांना घडवले त्या शाळेच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी विद्यार्थ्यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा ( 1,11,111/- ) निधी संकलित करून त्याचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक  नेवाळे, माजी मुख्याध्यापक  कोतवाल , पर्यवेक्षक खरात ,  बांगर ,  ननावरे , जढर ,  गायकवाड सर, सौ कंद ,  राजाराम काकडे ,  काटकर , भरीत  यांच्या कडे सुपूर्द केला..

  शाळेच्या सायन्स हॉल मध्ये फुलांची सजावट करून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी भारावून गेले. माजी विद्यार्थी सचिन लोणकर, अक्षय कदम (CA), अभिजीत मदने,तुषार दादा गायकवाड ,  विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारची तीस झाडे लावली.. सूत्रसंचालन योगेश काकडे(उद्योजक), असीम मणियार(ॲक्सिस बँक मॅनेजर) , संग्राम जगताप(ग्रामपंचायत सदस्य) यांनी केल.अनेक वर्षांनी भेटल्यानंतर माजी विद्यार्थी नूतन गावडे, माधवी कुंजीर ,अक्षय कदम(CA),सुजित काकडे(उद्योजक) , दत्ता सातपुते(उद्योजक) व सर्व शिक्षक यांनी आपली मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा देत सुप्रिया सुरवसे या विद्यार्थिनीने आणि वाळके बाई यांनी छानसे गीत सादर करत कार्यक्रमाची सांगता केली.

 तर काहींनी शाळेतील विनोदी प्रसंग सांगितले.. यावेळी मोहिनी कदम, प्राची रिकामे, दिपाली पायगुडे, पुनम कुंजीर ,अश्विनी सुतार (पोलीस पाटील), मेघा लोणकर, रोहित गोरसे, प्रशांत भोंडवे (उद्योजक),पृथ्वीराज काकडे(उद्योजक), बबन गाढवे, अविनाश गावडे, सोमनाथ रिकामे ,राहुल राजगुरू, दत्ता शितकल, योगराज गायकवाड(उद्योजक) आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments