अभिजीत पाटील यांच्या पॅनलला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 15, 2022

अभिजीत पाटील यांच्या पॅनलला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा

 अभिजीत पाटील यांच्या पॅनलला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर करखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून पूर्ण ताकदीने जी तयारी सुरू आहे. यालाच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तानाजी बागल,सचिन पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे  यामुळे विठ्ठलच्या निवडणुकीत ताकदीने लढण्यासाठी मोठे बळ मिळणार आहे.

   अभिजित पाटील यांनी विठ्ठलच्या निवडणुकीत उतरताना केवळ स्वतःला चेअरमन मिळावे या भूमिकेतून  निवडणूक लढविण्यासाठी तयारी केलेली नाही. केवळ सभासद आणि कामगार तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेणारे संचालक मंडळ असावे याच भूमिकेतून निवडणुक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

  अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद कार्यक्षेत्र असलेल्या विविध भागांतून आपला गावभेट,  आणि बहुतांवशी सभासद यांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या आहेत. यामुळे प्रत्येक सभासद यांच्यापर्यंत कारखाना चांगला चालवून दाखविणारे म्हणुन  त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

  अभिजीत पाटील यांच्या पॅनल मधील काही अर्ज छाननी वेळी नामंजूर करण्यात आले आहेत. असे असले तरी तगडे पॅनल या विठ्ठलच्या निवडणुकीत उतरविण्यासाठी मोठी व्युहरचना आखली जात आहे. केवळ संचालकांच्या वैयक्तिक हिताचे निर्णय न घेता सभासद आणि कामगार, ऊस उत्पादक शेतकरी यांच्याच हिताचे निर्णय घेणारे पॅनल या निवडणुकीत उत्तरविणार असल्याचेही अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.

 सध्या मागील  अनेक महिन्यापासून विठ्ठलच्या निवडणुकीत उतरून एक आदर्श निर्माण करण्यासाठी अभिजीत पाटील यांनी पाऊल टाकले आहे 

 विठ्ठलच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रकारे अडचणी करण्यासाठी अनेक गुप्त शक्ती प्रयत्न करीत आहेत. मात्र या निवडणुकीत सभासद आणि कामगार , ऊस उत्पादक शेतकरी यांच्या दृष्टीने  स्वतःच्या प्रपंचाशी निगडित असलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages