केंद्रसरकारच्या 'अग्निपथ' विरोधात राष्ट्रवादी युवक रस्त्यावर;राज्यभर युवक व विद्यार्थी आक्रमक...

मुंबई (नासिकेत पानसरे):- सैनिक होऊ पाहणाऱ्या मुलांच्या आयुष्यात 'अग्निपथ' घेऊन येणाऱ्या केंद्रसरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करण्यात आले राज्यातील नांदेड - किनवट , औरंगाबाद - सिल्लोड , पुणे - पुरंदर, ठाणे, भंडारा, गोंदिया, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. तर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अमरावती येथे तर कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी पुणे येथे सहभाग घेतला. चंद्रपूर यासह इतर जिल्हयातही युवकांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाला विद्यार्थी व युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला अशी माहिती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.
0 Comments