Hot Posts

6/recent/ticker-posts

आदर पुनावला ग्रुप व एमआयटी विद्यापीठाने व ग्राम पंचायत लोणी काळभोर मुळामुठा नदी स्वच्छतेचा संकल्प घेतला हाती

आदर पुनावला ग्रुप व एमआयटी विद्यापीठाने व ग्राम पंचायत लोणी काळभोर मुळामुठा नदी स्वच्छतेचा संकल्प घेतला हाती

                पुणे (कटूसत्य वृत्त):-गटारीचे पाणी पवित्र अशा नद्यांमध्ये सोडून त्यांचे पाणी प्रदूषित केले आहेच; पण पुलांच्या कठड्यांचा वापर बहुसंख्य पुणेकरांकडून घरातील कचऱ्याची पिशवी, तीसुद्धा प्लास्टिकची नदीमध्ये फेकण्यासाठी केला जातो आहे, त्याकडे सर्व सरकारी यंत्रणांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहेपुणे शहराला जवळपास ४१ किलोमीटर अंतराचा नदीकिनारा लाभला आहे. क्वचितच एखाद्या शहराला अशी जलसमृद्धी मिळते. मात्र दुर्लक्ष होत असल्यामुळे या किनाऱ्यांची शब्दश: वाट लागली आहे. मुळा-मुठा अशा दोन्ही सरिता किनाऱ्याने तर खराब झाल्या आहेतच; आता अशा वरून कचऱ्याच्या पिशव्या पडत असल्याने त्यांचे उरलेसुरले पात्रही खराब झाले आहे. नदीच्या किनाऱ्यांवरून थोडे चालत गेले तरी अशा पिशव्यांचा खच पात्रातून वाहताना जागोजागी दिसतो.आमची इच्छा आहे की आपण सगळे जलप्रेमी या कामात सहभागी होऊन मुळा मुठा नदी वाचवायला मदत करावी.  

                सध्या रोज सकाळी ०७ ते ०९ पर्यन्त नदीवर जाउन जलपर्णी काढायचे काम हाती घेतले आहे. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात अपेक्षित आहे. आपण यामध्ये सामील होणारच आहात पण आपल्या फ़्रेंडलिस्ट मधील लोकांना पण यात SUGGEST/ REFER करा.

                मोठ्या संख्येने या कार्यात सहभागी व्हा.आपण सर्व जण मिळून मुळा मुठा नदिला वाचवुयात. एक छान गाव बनवुयात.

                यावेळी ग्रामपंचायत क्षेत्रातील कार्यक्षम असणारा जय हिंद ग्रुप, पुनावाला ग्रुपचे सिईओ श्री.कृष्णन सर, पुनावाला ग्रुपचे अधिकारी, कर्मचारी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.महेशजी चोपडे, (क्रिया) इनोव्हेशनचे चेअरमन डॉ.राहुलजी मोरे, सुरक्षा व दक्षता विभाग प्रमुख कर्नल मोहनजी मेनन, आर्किटेक्चर कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉ.अश्विनी पेठे, सिव्हील इंजिनीअरिंगचे प्रमुख डॉ.सतिशजी पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.सविताताई लांडगे, मर्चट नेव्ही कॉलेजचे व्हॉईस प्रिन्सिपल श्रीकांत गुंजाळ सर, स्वयंसेवक, लोणी काळभोर सरपंच माधुरी राजेंद्र काळभोर ,विद्यापीठाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments