नगरपरिषद प्रशासनाची भूमिका रेल्वे उड्डाणपुला बाबत सकारात्मक.!

मुख्याधिकाऱ्यांनी आरपीआय च्या शिष्टमंडळाला दिला शब्द.!
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- गेट नंबर ३८ वरील उड्डाण पुला बाबत नगर परिषद प्रशासनाची भूमिका सकारात्मक असून लवकरच पाठपुरावा करून रेल्वे मार्फत सुरू झालेल्या भुयारी मार्ग कामाला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी निवेदनकर्त्या आरपीआय च्या शिष्टमंडळाला सांगितले.
कुर्डूवाडी तील रेल्वेगेट वरून उड्डाणपूल होणार की भुयारी मार्ग यामध्ये नागरिक द्विधा मनस्थितीत असतानाच भुयारी मार्गाचे कामकाज सुरू झाल्याचे समजताच यावर कुर्डूवाडी शहर आरपीआय आठवले गटाच्या वतीने शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी यांच्याकडे उड्डाणपूला संबंधी तात्काळ पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली होती.
यावेळी आरपीआय कुर्डुवाडी शहर अध्यक्ष प्रशांत उर्फ बाळासाहेब शेंडगे आर.पी.आय युवा नेते आकाश जगताप आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे यापूर्वीच शासन व प्रशासनाने संगणमत करून भुयारी मार्गासाठी कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या वतीने ठराव घेऊन तो पास केला होता व तश्या पद्धतीचे पत्र रेल्वेला दिल्याचे लक्षात आणून दिले त्यामुळेच रेल्वेने भुयारी मार्गाचे काम सुरू केल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावरती पूर्वीचे दिलेल्या ठराव संबंधी निर्णय बदलून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उड्डाणपूल मंजूर केल्याची गोषणा केली असल्याने त्या ठिकाणी पूर्वीचे कागदपत्रे न वापरता नव्याने उड्डाणपुला संबंधित रेल्वे बोर्डाला कागदपत्रे देण्यासाठी नगर परिषदे मार्फत प्रयत्नशील राहू असे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे अशी माहिती आर पी आय चे युवा नेते आकाश जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
0 Comments