माजी आमदार रमेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पोखरापूर येथे खाऊ वाटप

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रमेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार रमेश कदम यांचे निकटवर्तीय समर्थक सुधीरबापू खंदारे यांच्या वतीने पोखरापूर येथे शालेय विद्यार्थ्यांना यांच्यातर्फे खाऊ वाटप करण्यात आले. माजी आमदार कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून तालुक्यात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय सोलापूर शहरात आणि उत्तर सोलापूर पंढरपूर तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या शुभेच्छा उपक्रमांबद्दल आमदार कदम यांच्या परिवारातून कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.
याशिवाय सोशल मीडियावर अनेक कदम समर्थकांनी शुभेच्छा पोस्ट स्टेटस ठेवून त्यांना या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. माजी आमदार रमेश कदम हे जरी मतदारसंघात नसले तरी त्यांनी गत पाच वर्षात केलेल्या अनेक विकासकामांमुळे सर्वसामान्यांमध्ये त्याची क्रेझ आजही कायम असल्याचे सुधीर खदांरे यावेळी म्हणाले.यावेळी संयोजक सुधीर खंदारे, खंडाळी माजी सरपंच शशिकांत कसबे पोखरापुर गावचे उपसरपंच आशिष बापू आगलावे, मगरवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य संजय वाघमारे, ज्येष्ठ मार्गदर्शक धोंडीबा दादा उन्हाळे, बालाजी उन्हाळे, समाधान खंदारे, रवी खंदारे, प्रकाश खंदारे, शरद खंदारे, चेतन सकट व शिक्षक मुख्याध्यापक इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments