Ads

Ads Area

उद्यमिता यात्रेचा पुण्यात समारोप

 उद्यमिता यात्रेचा पुण्यात समारोप

           

पुणे (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमुंबई व युथ एड फाउंडेशन संस्था पुणे मार्फत १० मे  ते २० जून २०२२ कालावधीत आयोजित राज्यव्यापी उद्यमिता यात्रेची सांगता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पुणे येथे झाली.

राज्यातील विविध जिल्ह्यातील उमेदवारांचे समुपदेशन करुन स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी व त्या अनुषंगाने युथ एड फाउंडेशन संस्थेमार्फत बीज भांडवल देण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

सांगता कार्यक्रमात ३०० इच्छुक नवउद्योजकांना विविध स्वयंरोजगार सुरु करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या शोधून यश मिळविण्यासाठी हिंमतविश्वास आणि प्रयत्न ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. उद्यमिता यात्रा यासाठी कार्य करत असून समाजामध्ये उद्योजकतेची मानसिकता रुजविण्यास यात्रेची मदत होणार आहे. आगामी काळात ४ हजार नवीन उद्योग सुरु करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यास सुमारे २ लाख लोकांना याचा फायदा होऊ शकणार आहेअसे मत आयुष प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केले.

कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवारसहायक आयुक्त कविता जावळेॲड.अविनाश साळवेप्राचार्य डॉ.अनवर शेखसंग्राम खोपडे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close