कार्यालयात आलेल्या लाभार्थीचे सेवा भावी वृत्तीने कामे करा.!

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुका पंचायत समिती कार्यालयात काम घेऊन आलेल्या लाभार्थीचे सेवा भावी वृत्तीने व प्राधान्याने प्रामाणिक पणे काम करण्याच्या सूचना देऊन कामात आणखी प्रगती अपेक्षित असल्याचे मत पंचायत राज समितीचे प्रमुख ना.संजय रायमूलकर यांनी व्यक्त केले.
येथील विठ्ठलराव शिंदे सभागृहात महाराष्ट्र विधानमंडळ पंचायती राज समितीची भेट,बैठक व जिल्हा परिषदेच्या सन २०१५-१६ सन १६-१७ चा लेखा परीक्षा अहवाल व २०१७-१८ या वर्षांच्या वार्षिक प्रशासन अहवाल तपासणी झाल्या नंतर उपस्थित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पंचायत राज समिती सदस्य आ.कृष्णा गजबे,आ.डॉ.रत्नाकर गुट्टे,आ.शेखर निकम,आ.डॉ.राहुल पाटील,यांचासह माढ्याचे आ.बबनराव शिंदे उपस्थित होते.
यावेळी विधानमंडळ अवर सचिव प्रकाशचंद्र खोंदले,प्रतिवेदक मंगेश कांबळे,लेखा संचालक माधवराव नागरगोजे,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सोलापूर दिलीप स्वामी,कार्यकारी अभियंता दीपक कोळी जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव,गटविकास अधिकारी संताजी पाटील.व पंचायत समितीच्या सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.
0 Comments