पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरती – उद्योगमंत्री सुभाष देसाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 17, 2022

पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरती – उद्योगमंत्री सुभाष देसाई

 पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरती – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील आदी उपस्थित होते.

महामंडळातील सरळसेवेची वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मधील १४ संवर्गातील ८६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील ११ संवर्गातील ५०२ पदांकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्यातील पाच जणांना प्रातिनिधीक स्वरुपात मंत्रालयात नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

दरम्यान, या परीक्षेत कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. भरती प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुख्यालयीन स्तरावरून समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आली. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाइन किंवा पोस्टाद्वारे नियुक्तीपत्रे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, शासनाद्वारे राबविलेली सर्वाधिक पारदर्शक नोकरभरती असल्याचे समाधान मंत्री देसाई यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages