जि प प्रा शाळा बलवडीचे मंथन परीक्षेत सुयश

नाझरे (कटूसत्य वृत्त):- जि प प्रा शाळा बलवडी येथील विद्यार्थिनी कु स्वरांजली संजय कुमार सासणे हिचा इयत्ता चौथी मंथन परीक्षेत केंद्रात दुसरा क्रमांक जिल्ह्यात एकविसावा आणि राज्यात चोविसावा नंबर आला सदर विद्यार्थिनीस वर्ग शिक्षिका योगिता शांत यांचे मार्गदर्शन लाभले इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी स्वराली वसंत राऊत हिचा केंद्रात दुसरा जिल्ह्यात पस्तिसावा व राज्यात अडतिसावा नंबर आला सदर विद्यार्थी वर्ग शिक्षिका सोनल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर विद्यार्थिनींचा सत्कार शाळेतर्फे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विकास पवार आणि मुख्याध्यापक मनोहर पवार यांच्या हस्ते करण्यात आला सदर प्रसंगी शाळेचे सहशिक्षक गोरखनाथ बनसोडे माणिक मिसाळ सागर गुरव विजयकुमार शिंदे पालक वसंत राऊत वैशाली सासणे पालसांडे ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी हजर होते सर्वांनीच शाळेचे व यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.
0 Comments