Hot Posts

6/recent/ticker-posts

मोफत प्रवेश,गणवेश, शै. साहित्य देऊन टेंभुर्णी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

 मोफत प्रवेश,गणवेश, शै. साहित्य देऊन टेंभुर्णी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

 

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- येथील श्री संत रोहिदास प्राथमिक, आणि जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळेत मुलांना मराठी वर्गाबरोबरच सेमी वर्गातही मोफत प्रवेश दिला जात आहे.या मोफत प्रवेशासोबतच मुलांना बोनस तथा बक्षीस म्हणून सुंदर शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्या मध्ये वह्या, पाटी-पेन्सिल, पेन, कंपास पेटी आदी साहित्याचे पहिल्याच दिवशी  पूर्णपणे मोफत वाटप करून  आश्रम शाळेचे एक नवा आदर्श उभा केला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारी मुळे आर्थिक कंबरडे  मोडलेला गरीब पालक वर्ग भरमसाठ फी च्या भीतीने हैराण झालेला होता.

    अशातच अडचणीच्या  काळात  येथील श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्री संत रोहिदास प्राथमिक व जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळेतील जुन्या व नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वह्या पेन कंपास पेटी आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

       मूळचाच शैक्षणिक दर्जा उत्तम असणाऱ्या  आणि दहावी बारावीत शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासणाऱ्या टेंभुर्णी आश्रम शाळेतील हा नवा उपक्रम म्हणजे दुधात साखर असल्याचे मत जाणकारांमधून व्यक्त होताना दिसते आहे.गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीत शाळा बंद असल्याने मुलांचा शाळेशी संपर्क जवळपास तुटलेलाच होता.त्यांना पुन्हा शाळेची गोडी लागावी, शिकण्याची ओढ निर्माण व्हावी म्हणून

मोफत प्रवेशासह गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप करण्याचा स्तुत्य निर्णय संस्थेचे संस्थापक कैलास सातपुते सर यांनी घेतल्याने टेंभुर्णी शहर परिसरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे.टेंभुर्णी  शहर परिसरामध्ये जिल्हा परिषदेसह खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच स्वयं अर्थसहाय्यित आणि इंग्रजी माध्यमांच्या अशा एकूण जवळपास २०-२२ शाळा आहेत.

     या सर्व शाळांपैकी फक्त आश्रम शाळेतच मुलांना एक रुपया देखील प्रवेश फी न आकारता मोफत गणवेश वह्या पुस्तके पेन कंपास पेटी चे साहित्य देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे अभिवचन या प्रशालेतील शिक्षकांनी दिले असून भविष्यात आश्रम शाळेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ हा नक्कीच वाढेल यात मुळीच संकोच नाही.


Reactions

Post a Comment

0 Comments