गजानन महाराजांच्या पालखीचे हिंगोलीत आगमन

पंढपुर (कटूसत्य वृत्त):- निमित्त देशभरातून भाविक पंढरीपुरला जात असतात.कोरोनाच्या काळानंतर सावळ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आतूरअसलेले वारकरी पायी वारी करीत आहेत. भगव्या पताका लावून अनेक जिल्ह्यातून दिंड्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण झाल्या आहेत. विदर्भातील शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीला पंढपुरात चांगला मान आहे. गजानन महाराजांच्या पालखीमध्ये घोडे हत्ती भगव्या पताका सुंदर स्वच्छ पोशाख परिधान केलेलं स्वयंसेवक सुरक्षा रक्षक वैद्यकीय अधिकारी अशी संपूर्ण सोयी सुविधा असणारी पालखी असते. सिस्तबद्धपणा घोडे हत्ती हे या पालखीचे मुख्य वैशिष्ट्ये असते. विदर्भातील हजारो भाविक या पालखी सोबत पंढरीच्या वारीला जात असतात. पायदळ पालखी घेऊन जाण्याच हे या पालखीच 55 व वर्ष आहे. गाजनन महाराजांची ही वैशिष्ट्यपूर्ण पालखी विदर्भातून आज मराठवाड्यात दाखल झालीये.
हिंगोली जिल्ह्यातील पान कन्हेरगांव येथे सकाळीच पालखीच आगमन झालंय, हिंगोलीकरांनी या पालखीचे कन्हेरगांव येथे भव्य स्वागत करून त्यांना अल्पोआहार दिला. अनेक ठिकाणी पालखीच स्वागत करण्यात आलं. गजानन महाराजांच्या पालखीचा आज सेनगाव शहरातील कृषी उत्पन्न समितीच्या प्रांगणात मुक्काम असणार आहे. या पालखीचा उद्याचा मुक्काम हा हिंगोली तालुक्यातील डीग्रस कऱ्हाळे येथे असणार आहे तर परवाचा आणि शेवटचा मुक्काम औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे असणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात ही पालखी प्रवेश करणार आहे.
0 Comments