Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबईतील कोळीवाडे गावठाणांच्या पुनर्विकासासाठी 5 एफएसआय देण्याची रिपब्लिकन आगरी कोळी आघाडी अध्यक्ष ऋषी माळी यांची मागणी

 मुंबईतील कोळीवाडे गावठाणांच्या पुनर्विकासासाठी 5 एफएसआय देण्याची रिपब्लिकन आगरी कोळी आघाडी अध्यक्ष ऋषी माळी यांची मागणी

कोळी गावठाणांच्या विकासासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - ऋषी चिंतामण माळी

मुंबई (नासिकेत पानसरे):-  मुंबई ठाणेसह  संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश  क्षेत्रातील आदिवासी पांडे;आगरी कोळी समाजाची  गावठाण्यांचा पूर्णविकास करण्यासाठी  सध्या 1.5 असलेला  एफ एस आय वाढवून 5 एफ एस आय द्यावा या मागणी सह आगरी कोळी समाजाच्या मुंबईतील गावठाणांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात कोळी आगरी आघाडी चे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे कोषाध्यक्ष आणि रिपब्लिकन आगरी कोळी आघाडी चे अध्यक्ष ऋषी चिंतामण माळी यांनी आज गोराई येथे हॉटेल बेव्ह्यू जवळ रिपाइं च्या जन संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.

 मुंबईतील गावठाण आणि आदिवासी पाडे स्वातंत्र्य पूर्व काळापासून शंभर वर्षांहून अधिक  जुने आहेत. या गावठाणांच्या सीमारेषा राज्यशासनाने अद्याप निश्चित केल्या नसून या गावठाण आणि आदिवासी पड्यांचे सर्व्हेक्षण करून गावठाणांच्या सीमारेषा निश्चित कराव्यात.

एस आर ए च्या धर्तीवर स्वतंत्र गावठाण विकास प्राधिकरण स्थापन करून गावकऱ्यांच्या इच्छेनुसार विकासक निवडून गावठाणांचा विकास करावा. गावठाण विकसित करण्यासाठी सी आर झेड च्या कायद्यातील अटीं शिथिल  कराव्यात.  कोस्टल रोड बनविण्यासाठी सी आर झेड कायद्यातील नियम शिथिल केले आहेत तसेच गावठाण विकसित करताना सी आर झेड नियम शिथिल करावेत. गावठाण विकसित केल्यानंतर उभ्या राहणाऱ्या इमारती घरांना  आदिवासी आगरी कोळी भूमीपुत्रांची घरे म्हणून असेसमेंट टॅक्स माफ करावा. मुंबईत 500 फुटांच्या घरांना असेसमेंट टॅक्स माफ करण्यात आला आहे तसेच गावठाणांच्या घरांना असेसमेंट टॅक्स माफ करावा.त्यामुळे गावठाणांच्या विकसाला कोणीही विरोध करणार नाही  या मागण्यांचे निवेदन आम्ही केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना दिले असून लवकरच केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपाइं कोळी आगरी आघाडीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती रिपाइं चे आगरी कोळी आघाडी अध्यक्ष ऋषी माळी यांनी दिली.यावेळी रिपाइं चे  ऋषी माळी। सुनील गमरे;जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव; ऍड. अभयाताई सोनवणे; संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

गावठाणांच्या विकासाबाबत रिपब्लिकन पक्षाने केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर वेळ पडल्यास रिपाइं च्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ऋषी माळी आज दिला. 

Reactions

Post a Comment

0 Comments