Hot Posts

6/recent/ticker-posts

न्यू इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी इयत्ता दहावी 100%निकालात हॅट्रिक

 न्यू इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी  इयत्ता दहावी 100%निकालात हॅट्रिक


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- येथील रयत शिक्षण संस्थेचे,न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाची सन-2021-22 इयत्ता दहावी बोर्ड प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल या ही वर्षी परंपरा राखत  100%निकाल  लागला असून विद्यालयातील खालील विद्यार्थी गुणानुक्रमे पहिले तीन आले -
*1)कु.- भास्करे प्रतिक्षा विवेक- 96 .80%
2)कु.- देशमुख साक्षी अमर-96.40%
3)कु.- नाळे साक्षी नागनाथ- 95.40%*
 *विद्यालयातून 136 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधून 43 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त जास्त गुण मिळवले असून विशेष प्राविण्य -105 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत- 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.* उज्वल यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक मान. श्री लेंडवे एस.डी,पर्यवेक्षक मान. भुजबळ एम.एस.,स्कूल कमिटी सदस्य -परमेश्वरमामा देशमुख, नानासाहेब काळे, रमेश येवले- पाटील, वसंतराव येवले- पाटील,परमेश्वर देशमुख यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments