सोलापूर जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाची सांगता... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 30, 2022

सोलापूर जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाची सांगता...

सोलापूर जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाची सांगता... 

जिल्ह्यात एकूण 2 कोटी 29 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप तर 2 कोटी 16 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन

ऊस गाळपात माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना ( यूनिट 1) देशात प्रथम क्रमांकावर

रिकव्हरी मध्ये श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर

               बेंबळे (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील सन 2021-2022 चा ऊस गळीत हंगाम आता संपलेला असून या गळीत हंगामात सहकारी 12 व खाजगी 21 अशा एकुण 33 साखर कारखान्या मधून 2 कोटी 29 लाख 55हजार 094 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून 2 कोटी 16 लाख 17 हजार 090 क्विंटल साखरेचे जिल्ह्यात उत्पादन करण्यात आले आहे, या हंगामात जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा(रिकव्हरी ) 9.42% असा आहे. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट 1 मध्ये चालू गळीत हंगामात 24 लाख 78 हजार 922 मेट्रिक टन उसाचे गाळप करून जिल्ह्यात, राज्यात व देशात या कारखान्याने ऊस गाळपात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे व हा एक ऊस गाळपातील ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जिल्ह्यामध्ये श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची (रिकव्हरी) साखर उतारा 11.34 टक्के असून हा कारखाना साखर उताऱ्यात( रिकव्हरी मध्ये) जिल्ह्यात प्रथम स्थानावर आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यात झालेले ऊस गाळप व साखर उत्पादन खालील प्रमाणे...

               1) सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना अकलूज.. गाळप 13 24 229 मेट्रिक टन ...साखर 12 92 601 क्विंटल, 2) सदाशिवनगर साखर कारखाना...  गाळप  34 64  55 मेट्रिक टन, साखर 333500 क्विंटल, 3) सिद्धेश्वर सहकारी ,कुमठे  गाळप 13 24 600 मेट्रिक टन, साखर 13 13 845 क्विंटल, 4) भीमा सहकारी टाकळी- सिकंदर मोहोळ गाळप 4815 24 मेट्रिक टन, साखर 45 15 00 क्विंटल 5) पांडुरंग सहकारी श्रीपुर 12 51 345 मेट्रिक टन, साखर 14 19 285 क्विंटल 6) संत दामाजी मंगळवेढा 38 57 05  मेट्रिक टन, साखर 39 95 00 क्विंटल 7) सांगोला सहकारी  33 33 30 मेट्रिक टन,साखर 32 26 70 क्विंटल 8) सहकार शिरोमणी भाळवणी गाळप 43 63 33 मेट्रिक टन, साखर 42 27 20 क्विंटल 9) विठ्ठलराव शिंदे युनिट 1 पिंपळनेर, 24 78 922 मेट्रिक टन, साखर 23 45000 क्विंटल 10) मकाई भिलारवाडी ,करमाळा 31 61 07 मेट्रिक टन ,साखर 27 77 50 क्विंटल, 11) कूर्मदास पडसाळी 24 76 20 मेट्रिक टन,साखर 2030 85 क्विंटल 12) लोकनेते अनगर 84 92 76 मेट्रिक टन ,साखर 86 77 00 क्विंटल 13) सासवड माळी शुगर माळीनगर 60 62 10 मेट्रिक टन, साखर 57 28 50 क्विंटल 14) लोकमंगल बीबीदारफळ 31 50 79 मेट्रिक टन, साखर 25 63 65 क्विंटल  15) विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव 7803 82 मेट्रिक टन, साखर 58 82 00, 16)लोकमंगल भंडारकवठे 76 68 95 मेट्रिक टन, साखर 63 35 50 क्विंटल 17) सिद्धनाथ शुगर तिर्हे 65 85 62 मेट्रिक टन, साखर 56 63 50 क्विंटल 18) जकराया वटवटे 46 57 69 मेट्रिक टन,साखर 40 12 00 क्विंटल 19) भैरवनाथ विहाळ 55 15 77 मेट्रिक टन, साखर 51 85 00 क्विंटल 20) इंद्रेश्वर बार्शी  60 41 11 मेट्रिक टन, साखर 56 86 00 क्विंटल 21) मातोश्री - रुद्देवडी 52 72 24 मेट्रिक टन, साखर 5116 25 क्विंटल  22) विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट 2 करकंब 65 55 65 मेट्रिक टन, साखर 66 00 50 क्विंटल 23) सिताराम खर्डी 35 40 19 मेट्रिक टन, साखर 32 83 50 क्विंटल  24) ओंकार शुगर चांदापुरी 27 51 61 मेट्रिक टन, साखर 26 71 30 क्विंटल 25) युटोपियन कचरेवाडी 63 53 35 मेट्रिक टन ,साखर 46 21 00 क्विंटल 26) भैरवनाथ लवंगी 50 50 20 मेट्रिक टन, साखर 48 3100 क्विंटल 27) भैरवनाथ शुगर आलेगाव 55 54 67 मेट्रिक टन ,साखर 530000 क्विंटल 28) जय हिंद आचेगाव, दक्षिण सोलापूर 1139 385 मेट्रिक टन, साखर 9748 25 क्विंटल 29 )बबनराव शिंदे शुगर केवड/ तुर्क पिंपरी 1023 905 मेट्रिक टन ,साखर 1023955 क्विंटल  30) गोकुळ लक्ष्मी धोत्री 760830 मेट्रिक टन, साखर 748395 क्विंटल 31) विठ्ठल रिफायनरी/ कमला भवानी, पांडे- करमाळा 715465 मेट्रिक टन, साखर 701240 क्विंटल 32) गोकुळ माउली तडवळे 75 82 76 मेट्रिक टन, साखर 66 88 00 क्विंटल 33) औदुंबर राव पाटील शुगर आष्टी 53 54 12 मेट्रिक टन, साखर 50 27 50 क्विंटल. ...

               एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये या गतहंगामात 2 कोटी 29 लाख 55 हजार 094 मेट्रिक टन उसाचे गाळप तर  2 कोटी 16 लाख 17हजार 090 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे व वहा एक जिल्ह्यातील ऊस गाळपाचा ऐतिहासिक विक्रम ठरत आहे हे निश्चित, तसेच जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ( रिकव्हरी ) 9.42%  आहे व हा साखर उतारा( रिकव्हरी) पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या रिकव्हरीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते.

               सोलापूर जिल्ह्यात एकूण 37 साखर कारखाने असून या पैकी 33 साखर कारखान्यानी गाळप हंगामात या वर्षी सहभाग घेतला होता तर स्वामी समर्थ अक्कलकोट, कुमुद-आर्यन बार्शी, विठ्ठल सहकारी गुरसाळे ,पंढरपूर व आदिनाथ सहकारी करमाळा हे कारखाने बंद अवस्थेत होते, यातील विठ्ठल व आदिनाथ हे दोन्ही साखर कारखाने आगामी गळीत हंगामासाठी सहभागी होतील हे निश्चित.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages