बार्टी संस्थेत तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी
पुणे (कटुसत्य वृत्त): डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथे सोमवारी तथागत गौतम बुद्ध जयंती तथा बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
शताब्दी बुद्धविहार रेंजहिल्स रहिवासी सभा रेंज हिल्स पुणे व महा चुला हेलो नाच असोसिएशन बँकॉक थायलंड यांचेमार्फत बार्टी संस्थेस बुद्धरूप भेट स्वरूप देण्यात आले. बुद्ध जयंती निमित्त बुद्धरूपाचे अनावरण समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये व पोस्टल विभाग नवी मुंबईच्या संचालिका सरण्या गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धरूप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सदानंद कोचे, जीएसटीचे सहसंचालक प्रसाद गोरसे तसेच मंगलदास पाडविकर, डॉ. डी.एस.गायकवाड, डॉ. शांतीपाळ ओव्हाळ, शाहीर संभाजी भगत, बार्टीचे उमेश सोनवणे, सुमेध थोरात उपस्थित होते.
0 Comments