प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ११११ रक्तदात्यांचे रक्तदान

सांगोला (कटुसत्य वृत्त): रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष, लायन्स क्लब माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब सांगोला आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये २१ मे २०२२ रोजी नाझरा, लोणविरे,२३ मे रोजी सांगोला व कोळा या ठिकाणी एकूण ११११ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाचे अनमोल कार्य केले.
सांगोला येथील शिबिराच्या सुरुवातीला गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार लायन्स क्लब सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांच्या हस्ते समर्पित करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन डॉ.शैलेश डोंबे संस्थेचे सचिव म.शं.घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,ॲड उदयबापू घोंगडे यांचे हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून झाले. यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संस्थेचे पदाधिकारी, विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शिबिराला गटशिक्षणाधिकारी रणदिवे साहेब,शिक्षण विस्ताराधिकारी बाळासाहेब इंगोले,सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजकुमार,प्रशांत हुले, भा.ज.पा. तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार, वीरशैव लिंगायत समाज तालुका अध्यक्ष अमरदादा लोखंडे, माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे खजिनदार शंकरराव सावंत कार्यकारिणी सदस्य ॲड विजयसिंह चव्हाण, दिगंबर जगताप यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
या शिबिरासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला, सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर ,एम.एस.आय. ब्लड बँक मिरज यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी केले, सूत्रसंचालन लायन्स क्लब सांगोला सचिव उन्मेश आटपाडीकर यांनी तर सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील भोरे यांनी आभार प्रदर्शन केले.तर समारोप कार्यक्रमामध्ये रेवनील बँकेचे व्यवस्थापक सोमेश यावलककर यांचा सत्कार करण्यात आला.व शेवटी ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लबच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे अंतःकरण पूर्वक आभार मानले.
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या विचारावर,तत्वावर,कार्यावर, लोकांचे अपार प्रेम असल्यामुळेच २३ मे त्यांचे वाढदिवसानिमित दरवर्षी शेकडो रक्तदाते रक्तदान करतात.यावर्षी नाझरा येथे २१८,लोणविरे येथे १२८,कोळा येथे १४६ व सांगोला येथे ६१९असे एकूण ११११ रक्तदात्यांनी रक्तदान केले व नवा विक्रम प्रस्थापित केला.
0 Comments