ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे रक्तदान शिबिर

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निम्मित टेंभुर्णी येथे वंचित बहुजन आघाडी सोलापूर माढा विभाग यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबीरात ५३ रक्तदात्याने रक्तदान करून आपली सामाजाप्रती जबाबदारी दाखवली.१०.मे रोजीॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस असतो हा दिवस स्वाभिमान दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो.याचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी सोलापूर (माढा विभाग)जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या पुढाकाराने टेंभुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ५३ रक्तदात्याने रक्तदान केले या वेळी जिल्हा महासचिव विशाल नवगीरे,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप चव्हाण ,युवक जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे ,जिल्हा संघटक देविदास भोसले ,जिल्हा संघटक शरीफ काझी ,जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान हांडे, सदस्य औदुंबर लेंगरे पाटील ,ता.उपाध्यक्ष राजाभाऊ लोंढे ,उपाध्यक्ष दयानंद जानराव ,कुर्डुवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के ,युवक जिल्हा उपाध्यक्ष विशाल मिसाळ ,युवक जिल्हा उपाध्यक्ष अमर तांदळे , ता.प्रसिध्दी प्रमुख राम नवगिरे कुर्डुवाडी शहर उपाध्यक्ष अशपाक तवकल ,महासचिव जिशान मुलाणी,उपाध्यक्ष कृष्णा हजारे ,सदस्य धनंजय कोटवर,विशाल लोंढे, ॲड. जुगल खरात , प्रा.युवराज वजाळे ,सागर सरोदे ,किरण कांबळे ,विक्रम खरात ,किरण लोंढे, समाधान कांबळे आदी उपस्थित होते.
0 Comments