Hot Posts

6/recent/ticker-posts

चांडोली येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

चांडोली येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

                पुणे, (कटुसत्य वृत्त): राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत खेड तालुक्यात चांडोली येथील अनुसूचित जाती व नबवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.

                अनुसूचित जातीच्या मुलींसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के अपंग प्रवर्ग३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती ५ टक्के आणि विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के जागा आरक्षित आहेत.  प्रवेशासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, विद्यार्थी नोंद पत्रिका, विद्यार्थी व पालकांचे रंगीत चार छायाचित्रे, विद्यार्थ्याचे आधारकार्ड व बँकेचे पास बुक आवश्यक आहे.

                प्रवेश अर्ज मुलांची निवासी शाळा पेठ (आंबेगाव), दिवे (सासवड), तरंगवाडी (इंदापूर) आणि चांडोली (राजगुरुनगर) येथे उपलब्ध आहेत, असे मुख्याध्यापक एम.एम.वाघमारे यांनी कळविले आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments