शरद पाटील यांना आदर्श 'साहित्यसेवक-भाषागौरव' पुरस्कार
माढा (कटुसत्य वृत्त): माढा तालुक्यातील आढेगांव येथील शरद पाटील यांना लोकसेवा अकॅडमी मुंबई यांच्या वतीने साहित्यक्षेत्रात त्यांना मिळालेली पारितोषिके,नियमित लेखन,उत्कृष्ट साहित्य निर्मिती व साहित्य क्षेत्रामध्ये ते देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानचिन्ह, गौरवपदक,मानपत्र, महावस्त्र व मानाचा फेटा बांधून राज्यस्तरीय 'आदर्श साहित्यसेवक भाषागौरव' पुरस्कार देण्यात आला.
कवी शरद पाटील हे आढेगांव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच असून त्यांनी राज्यस्तरीय अनेक काव्य स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिक मिळविली आहेत. महाराष्ट्रातील अनेक दैनिक वृत्तपत्रांमधून त्यांच्या कविता व लेख नियमित प्रकाशित होत असून ते आपल्या साहित्यामधून समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत.मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने व मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्य निर्मितीबद्दल व साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना पुणे येथे दिनांक १६ मे २०२२ रोजी आदर्श साहित्यसेवक-भाषागौरव पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला.
0 Comments