शिव जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित स्पर्धेत उपासना झुंडरे, सारंग काळे, ओम नष्टे प्रथम
बेंबळे (कटुसत्य वृत्त): मराठा सेवा संघ माढा तालुक्याच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवराय वेशभूषा, जिजाऊ वेशभूषा, शिवराय मनामनात - शिवजन्मोत्सव घराघरात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत माढा तालुक्यातील १०० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जिजाऊ वेशभूषा स्पर्धेत उपासना दिपक झुंडरे हीने प्रथम, दिशीता संतोष वाळुंजकर हीने द्वितीय तर सिद्धी गणेश डांगे व दिया गोरख खटके हीने संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकाविला. शिवराय वेशभूषा स्पर्धेत सारंग मनोज काळे याने प्रथम, शिवांश कुलदीप खटके द्वितीय तर शिवंश स्वप्निल केमदारणे याने तृतीय क्रमांक पटकाविला. शिवराय मनामनात,शिवजन्मोत्सव घराघरात या स्पर्धेत शिवराज, संस्कार, स्वरूप, ओम नष्टे यांनी प्रथम, अर्णव मंगेश लचके याने द्वितीय तर पर्णल मच्छिंद्र शेंडगे व ईश्वरी संजय कावळे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी यश उद्योग समूह व यशोदिप फाऊंडेशनचे संस्थापक - अध्यक्ष गोरख खटके-पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. पारितोषिक वितरण सोहळ्या संबंधी अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी संयोज काशी संपर्क साधावा असे आवाहन मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी केले आहे.
0 Comments