ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा - सुरज चव्हाण

मुंबई (नासिकेट पानसरे):- रामचंद्र कह गये सीता मैंयासे ऐसा कलयुग आयेगा... ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा... असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
अयोध्या दौर्यावरुन उत्तरप्रदेशमध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. मात्र त्यावर राज ठाकरे यांनी एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान महाराष्ट्रात राज गर्जना करणारे राज ठाकरे चक्क उत्तरप्रदेशच्या खासदाराच्या धमकीला घाबरले असल्याची चर्चा असून त्यावर सुरज चव्हाण यांनी ट्वीट करत जोरदार टीका केली आहे.
0 Comments