पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन (चॅरिटेबल ट्रस्ट) तर्फे लोणी स्टेशन मालधक्का मधील हमाल माथाडी कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 3, 2022

पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन (चॅरिटेबल ट्रस्ट) तर्फे लोणी स्टेशन मालधक्का मधील हमाल माथाडी कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन

 पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन (चॅरिटेबल ट्रस्ट) तर्फे लोणी स्टेशन  मालधक्का मधील हमाल माथाडी कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन

           लोणी काळभोर (कटुसत्य वृत्त): 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन, लोणी काळभोर यांच्या वतीने  मालधक्का येथील हमाल माथाडी कामगारांसाठी मोफत 'आरोग्य तपासणी शिबीर' आयोजित करण्यात आले. 

           शिबिरात सर्व कामगारांची ब्लड शुगर ( रक्तातील साखरेचे प्रमाण ), ब्लड प्रेशर, दंतरोग, त्वचारोग इ. तपासण्या व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या मोफत शिबिराचा  250 कामगारांनी लाभ घेतला. 

                या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन  आदरणीय श्री. प्रताप अण्णा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात श्री. अशोक मोरे, श्री. रघुनाथ बोगले ( रेड्डी साहेब ), श्री. रणजित दादा गायकवाड, श्री. अजितदादा मोरे, श्री. अजिनाथ निगडे, श्री. शरद चव्हाण इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

     सदर कार्यक्रमात पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन च्या अध्यक्षा डॉ. सौ. वनिता काळभोर यांनी कामगारांना मे महिन्यात असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या दवाखान्यात एक्सरे, ईसीजी व इतर काही निवडक तपासण्यांमध्ये ५० टक्के  सुट देण्याचे आश्वासन दिले. सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार असोसिएशनचे खजिनदार डॉ. सुनिल गायकवाड यांनी मानले.

              या कार्यक्रमास डॉ. राहुल काळभोर, डॉ. रतन काळभोर,  डॉ. नितीन मटकर, पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. वनिता काळभोर, उपाध्यक्षा डॉ. सौ. तनुजा रासकर, सचिव डॉ. नितीन तांदळे, सहसचिव डॉ. स्वप्नील पाटील, खजिनदार डॉ. सुनील गायकवाड, सहखजिनदार डॉ. राजेश्वर नांगरे, डॉ. विकास बनसोडे, डॉ. ओमकुमार हालिंगे, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. रणजित म्हसवडे, डॉ. नागेश गवते, डॉ. प्रविण धर्माधिकारी, डॉ. संजय माने, डॉ. ओमप्रकाश तोडकरी, दंतवैद्य डॉ.संध्या कोळेकर, डॉ. अर्चना केंद्रे इ.डॉक्टरांनी  कामगारांची मोफत तपासणी करून त्यांना आरोग्याविषयक मार्गदर्शन केले.ब्ल्यु क्रोस फार्मसी चे मॅनेजर पलीत कुमार व अविनाश सुरवसे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages