देवेंद्र फडणवीस सध्या 'गजनी'तील आमीर खानसारखे...

मुंबई (नासिकेत पानसरे):- देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या काही वक्तव्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी 'गजनी' सिनेमातील 'आमीर खान' ची उपमा देत जोरदार प्रहार केला आहे.
गजनी सिनेमात आमीर खान हा आपण कोण आहे हे विसरतो आणि डायरीत लिहून ठेवतो तसं आता देवेंद्र फडणवीस यांना लिहावं लागणार आहे असा टोलाही क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना 'स्मृतिभ्रंश' झालाय असं वाटतं, कारण कधी ते बाबरी मशीद पाडली जात असताना तिथे उपस्थित होतो बोलत आहेत तर आता ते कदाचित १८५७ च्या बंडात तात्या टोपे यांच्यासोबत लढलो असेन असं बोलत आहेत. सत्ता गेल्याने एवढा मोठा शॉक? असा खोचक सवालही क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे.
0 Comments