नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 17, 2022

नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. पुणे विभागातील नागरिकांची निवेदने 21 मे 2022 रोजी स्वीकारली जाणार आहेत.

             महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावे, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी, असे आयोगातर्फे निवेदन करण्यात आले आहे. यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा.

             समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 21 मे 2022 (शनिवार -पुणे विभाग- वेळ- स. 9.30 ते 11.30-ठिकाण- विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे), 22 मे 2022 (रविवार- औरंगाबाद विभाग स. 9.30 ते 11.30-ठिकाण- विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद), 22 मे 2022 (रविवार- नाशिक विभाग सायं 5.30 ते 7.30-ठिकाण- विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक), 25 मे 2022 (बुधवार -कोकण विभाग दु. 2.30 ते 4.30-ठिकाण- विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन), 28 मे 2022 (शनिवार- अमरावती विभाग स. 9.30 ते 11.30-ठिकाण- विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती), 28 मे 2022 (शनिवार- नागपूर विभाग सायं 4.30 ते 6.30-ठिकाण- विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर).

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages