कोल्हापुरात होणार समता सैनिक दलाचे राज्य अधिवेशन
.jpeg)
राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन
लऊळ(कटुसत्य वृत्त):विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे राज्य अधिवेशन 28 आणि 29 मे रोजी पट्टणकोडोली जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी तसेच जिल्हा कार्यकारिणीचे 200प्रतिनिधी या अधिवेशनात उपस्थित राहणार असून राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते 28 मे रोजी सकाळी 9.30 मिनिटांनी अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.अशी माहिती समता सैनिक दलाचे सोलापूर जिल्हा जी ओ सी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली आहे.
शनिवार 28 मे रोजी पहिले सत्र 9.30 ते 1 या वेळेत होणार असून "समता सैनिक दलाच्या एकीकरनात आमचे योगदान आणि भूमिका" या विषयावर चर्चा होणार असून अध्यक्ष स्थानी दलाचे राज्याध्यक्ष भीममार्शल शत्रुघ्न चवरे( नागपूर )हे राहणार आहेत. या सत्राला प्रमुख अतिथी म्हणून ठाणे महानगरपालिका अप्पर आयुक्त संदीप माळवी हे तर विशेष अतिथी म्हणून तामिळनाडू येथील डॉ वेल्लुसामी हे उपस्थित राहणार आहेत. या सत्रात मान्यवरांचे स्वागत आणि परिचय प्रा डॉ गुलाब राजे (रत्नागिरी )हे करणार आहेत. या सत्रात रमेश जाधव (कोल्हापूर), चंद्रशेखर उराडे( नागपूर), संजय ओरके (नागपूर), आनंद रामटेके आणि किशोर भावे (छत्तीसगड), राजाभाऊ कदम( मुंबई), सुनिल कांबळे( बेळगाव कर्नाटक), दादा अंबादे (नागपूर), प्रदीप गायकवाड (नागपूर), मनोज खैरे (पुणे), जगदीश गवई (मुंबई) हे वक्ते म्हणून मनोगत व्यक्त करणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर हे उद्घाटनपर मार्गदर्शन करणार आहेत.
दुसरे सत्र दुपारी 2.30 ते4.30 या वेळेत" आंबेडकरी समाजासमोरील आव्हाने आणि उपाय" या विषयावर संपन्न होणार असून अध्यक्षस्थानी भीममार्शल संतोष मोहिते राहणार आहेत. वक्ते म्हणून विधीज्ञअभय लोखंडे( नागपूर )आणि धम्मा कांबळे (यवतमाळ )हे मनोगत व्यक्त करणार आहेत. "धम्मापुढील आव्हाने" या विषयावर डॉ एन व्ही ढोके (नागपूर) हे मनोगत व्यक्त करणार आहेत. या सत्राचे प्रास्ताविक जगन्नाथ शिंगे (सोलापूर) हे करणार असून सूत्रसंचालन हर्षिला चवरे( नागपूर )या करणार असून, पुंडलिक काकडे आभार व्यक्त करतील.
सायंकाळी4.30 ते6.30 या वेळेत लाठी काठी,दांडपट्टा, जिमन्यास्टिक, मानवी मनोरे अशी मैदानी प्रात्यक्षिके होतील.
तिसरे सत्र सायंकाळी6)६वा30ते८या वेळेत "युवा मार्शलचे अनुभव कथन आणि दलाकडून अपेक्षा "या विषयावर संपन्न होईल. अध्यक्षस्थानी डॉ अमित वराळे (रत्नागिरी )हे राहतील. यामध्ये संघपाल काकडे (सोलापूर), मयुरी कारंडे( कोल्हापूर), आयुष जाधव, क्रांती जाधव( चिपळूण), प्राप्ती पवार (गुहागर), इत्यादी मनोगत व्यक्त करणार आहेत. रात्री ८ ते ९ या वेळेत भोजन आणि ९ते १0 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील.
रविवारी २९ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत पहिले सत्र "आंबेडकरी पक्ष राजकारनात प्रभावहीन का?"या विषयावर संपन्न होणार असून अध्यक्षस्थानी विलास कांबळे(मुंबई)हे राहणार आहेत. वक्ते म्हणून प्रा गौतमीपुत्र कांबळे(सांगली) हे आहेत.
दुसरे सत्र सकाळी११वा१५ ते दु१वा१५मि या वेळेत "माता रमाईच्या परिप्रेक्षात आजच्या महिलांची जबाबदारी" या विषयावर असून अध्यक्षस्थानी प्रा दीक्षा कांबळे(रायगड)या असून वक्त्या म्हणून संगीता राजे (रत्नागिरी), मायाताई उके( नागपूर),डॉ विद्याताई राजहंस( कोल्हापूर ),डॉ साक्षी मोहिते (रत्नागिरी), अनुराधा मोहिते( रत्नागिरी ) या मनोगत व्यक्त करणार आहेत.प्रास्ताविक योगिता जाधव करणार आहेत.
तिसरे सत्र दु २:३० ते ४:३0या वेळेत " संविधान साक्षरता आजची गरज "या विषयावर संपन्न होणार असून अध्यक्षस्थानी रमेश जाधव(कोल्हापूर ) हे राहणार असून वक्ते म्हणून प्रा डॉ गुलाब राजे ( रत्नागिरी ),केरु जाधव( सोलापूर ),अण्णासाहेब भालशंकर ( सोलापूर ) हे मनोगत व्यक्त करणार आहेत. प्रास्ताविक मनोहर कदम( कोल्हापूर )हे करणार आहेत.
सायंकाळी४:३०ते६:३०या वेळेत चौथे आणि शेवटचे सत्र संपन्न होईल. या सत्रात सत्कार व समारोप होईल. अध्यक्षस्थानी दलाचे राज्याध्यक्ष शत्रुघ्न चवरे हे राहणार आहेत. स्वागत आणि प्रास्ताविक शशिकांत खांडेकर( कोल्हापूर )हे करणार आहेत. या सत्रात ठराव संमत करण्यात येतील. रमेश जाधव हे सर्वांचे आभार मानतील.
हे राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रमेश जाधव,,शत्रुघ्न चवरे, प्रा डॉ गुलाब राजे, संतोष मोहिते,योगिता जाधव, डॉ विद्याताई राजहंस, मयुरी कारंडे, शशिकांत खांडेकर,इत्यादी भीममार्शल प्रयत्नाची पराकाष्ठा करित आहेत.
0 Comments