Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकाभिमुख प्रशासनामुळे कैलास केंद्रे ठरत आहेत जनतेच्या मनातील "हिरो"

 लोकाभिमुख प्रशासनामुळे  कैलास केंद्रे  ठरत आहेत जनतेच्या मनातील "हिरो"




शहर विकासाचे  प्रयत्न,आणि शहरवासियाना वेळ देणारा अधिकारी अशी ओळख

सांगोला (जगन्नाथ साठे) सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्या पासून मागील 3 वर्षात श्री.कैलास केंद्रे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लोकाभिमुख प्रशासनास महत्व देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत.सर्व शासकीय योजनांची शहरात प्रभावी अंमलबजावणी करून एक आदर्श निर्माण केला आहे.कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी अत्यंत आपुलकीने संवाद करून त्यांच्या प्रश्नांची तात्काळ उकल करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.कोरोना च्या भीतीच्या काळात आपल्या संपूर्ण टीम समवेत फिल्ड वर उतरून केलेल काम,घेतलेले धाडसी निर्णय,त्यांची कडक अंमलबजावणी यांच्यामुळे त्यांच्या कार्याची उंची आणखीनच वाढली.
त्यांच्या 3 वर्षांच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णय,सुरू केलेल्या उपक्रमांपैकी महत्वाच्या कार्याचा घेतलेला मागोवा-
(1) प्रधानमंत्री आवास योजनेतून माघील 3 वर्षात 115 लाभार्त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे.
(2) 'पीयम स्वनिधी' योजनेच्या माध्यमातून 200 पेक्षा जास्त फेरी वाल्यांना कोरोना काळात 10 हजारांचे विनातरण कर्ज उपलब्ध करून देऊन विस्कटकेली आर्थिक घडी बसवण्यास हातभार लावला.
(3) शहरातील दिव्यांग व्यक्तींचा 4 लाखांचा विमा उतरवून दिव्यांग निधी खर्ची टाकण्याची एक नवी दिशा मुख्याधिकारी केंद्रे यांनी सबंध राज्याला दिली.
(4) माघील 3 वर्षात NULM योजने अंतर्गत 100 पेक्ष्या जास्त महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून देऊन तसेच त्यांना कमी व्याज दराचे 1.5 कोटी पेक्षा जास्त कर्ज उपलब्ध करून पापड
बनवणे,शेळीपालन इत्यादी व्यवसाय करण्यास व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोठा हातभार लावला आहे
(5) वर्षानुवर्षे कचरा डेपो वर साठलेल्या जुन्या कचऱ्यावर 'बायो मायनिंग' प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणावर खत निर्मिती करून कचरा डेपो वरील दुर्गंधीची समस्या कायमची मिटवली.
(6) कडलास रोड येथील कचरा डेपो वर *"मैला प्रक्रिया केंद्र(FSTP)"* तयार करून त्याठिकाण मैलापासून सोनखत निर्मितीस सुरुवात केली आहे.
(7) पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या व पाण्याचा  कटकरीने वापर कण्याची उद्देशाजे 340 नळांना वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत."जितका वापर तितकी पाणीपट्टी" यामुळे या 340 कुटुंबानी पाण्याचा काटकसरीने वापर सुरू केला परिणामी शहरात दररोज साधारणपणे जवळपास *20,000 लीटर* पाण्याची बचत होत आहे. 
(8) सांगोले नगरपरिषद मार्फत *"पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प"* सुरू करण्यात आला असून तो अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पामुळे *दर महिन्याला 21 लाख लिटर पाण्याची  बचत होणार आहे.*
(9) सांगोला शहरातील भूजल पातळी वाढावी यासाठी मुख्याधिकारी केंद्रे यांच्या संकल्पनेतून शहर हद्दीत 100 पेक्षा जास्त शोष खड्डे बनविण्यात आली आहेत.
(10) मुख्याधिकारी केंद्रे यांच्या संकल्पनेतून *"सांगोला वृक्ष बँक"* ची 7 जाने 2020 ला सथापना नगरपरिषदेमार्फत करण्यात आली.शासकीय कार्यालय स्तरावरील राज्यातील हा पहिला प्रयोग होता.केंद्रे यांच्या कार्यकाळात 3 वर्षात साधारण 15,000 झाडे शहरात लावली गेली आहेत व त्यांचे संवर्धन देखील केले जात आहे.
(11)नागरिकांमध्ये सौरऊर्जा वापराबद्दल जनजागृती व्हावी या हेतूने आरक्षण 47 बगीच्या मध्ये जुन्या सोलार प्लेट पासून *सोलार ट्री* ची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
(12) सांगोले नगरपरिषद मार्फत इ बाईक ची कलाकृती तयार करून इ बाईक कट्टा निर्माण करण्यात आला आहे नागरिकांपर्यंत संदेश पोहचवता यावा या हेतूने ही कलाकृती शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात एका भिंतीवर बनविण्यात आलेली आहे.सिनेस्टाईल भिंत फोडून ई बाईक बाहेर येत असल्याचे सुंदर चित्र रेखाटले असून ही एकूणच कलाकृती आकर्षक असल्याने अल्पावधीतच हा *'ई- बाईक कट्टा"* नागरिकांच्या पसंतीस उतरून एक सेल्फी पॉईंट बनला आहे.
(13) नगरपरिषद मालकीच्या इमारती व शहरातील इतर 14 सार्वजनिक इमारतींचे  रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काम पूर्ण झाले असून नविन इमारतीना बांधकाम परवानगी देताना *“रेन वॉटर हार्वेस्टिंग”* करणे बंधनकारक केले आहे. 
(14) नगरपरिषद हद्दीमधील सर्व पारंपारिक पथदिवे बदलून त्याठिकाणी नविन तंत्रज्ञानाचे उर्जाबचत करणारे माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये *2056* LED दिवे बसविण्यात आलेले आहेत. माझी वसुंधरा अभियान 1.0 मध्ये बसविण्यात आलेल्या *2089 LED दिव्यांची* देखभाल केली जात आहे.
(15) नगरपरिषदे मार्फत सुमारे *14000* रोपांची क्षमता असणाऱ्या नर्सरीची निर्मिती करण्यात आली आहे.
(16) केंद्रे यांच्या काळात सांगोला नगरपरिषदेस माझी वसुंधरा अभियानात राज्यात 11 वा क्रमांक, स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 4 राज्यात मिळून 36 वा क्रमांक, शहरास ODF++ मानांकन असे विविध पुरस्कार,मानांकन प्राप्त झाले आहेत.
(17)नुकताच महिलांच्या स्वराक्षणासाठी मुख्याधिकारी केंद्रे यांच्या संकल्पनेतून सांगोला नगरपरिषदेमार्फत 5 वी ते 9 वी च्या वयोगटातील मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण चा उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.
(18) भुयारी गटार योजना,धान्य बाजार व्यापारी संकुल उभारणी,आरक्षण 63,लोहार गल्ली असे 2 बगीचे विकसित करणे,नप कार्यालया समोर सुसज्ज अभ्यासिका उभारणे या व इतर अनेक महत्वपूर्ण कामांवर सध्या काम सुरू असून येत्या काळात ती पूर्ण होणार आहेत.
अश्या प्रकारे सतत नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून मुख्याधिकारी केंद्रे यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली आहे.आपल्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकास वेळ देऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे केंद्रे यांच्या कार्य शैलीचे वैशिष्ट्य आहे.आपल्या पदाचा कुठलाही गर्व न करता कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी तसेच सफाई कामगार,ड्राइवर व आपल्या स्टाफ शी आपुलकीने बोलणारा अधिकारी अशी केंद्रे यांची ओळख आहे.
आपल्या स्वभावामुळे श्री.केंद्रे हे कर्मचाऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहेत.त्यांच्या निर्भीड,कर्तव्यदक्ष कार्यशैली मुळे ते अनेक तरुणांचे आदर्श आहेत.शहरातील तरुणांनी मुख्याधिकारी यांच्या नावाने बनविलेल्या इन्स्टाग्राम पेज वरून ते ठळकपणे अधोरेखित होत.
स्वतःला झोकून आपले कर्तव्य चोखपणे बजावत असताना जनतेला केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख प्रशासनावर सतत भर दिल्याने मुख्याधिकारी केंद्रे हे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील "हिरो" आहेत.....!

Reactions

Post a Comment

0 Comments