Hot Posts

6/recent/ticker-posts

लथाबुक्क्यांनी मारहाण करत, शेतउपयोगी साहित्य जाळले

लथाबुक्क्यांनी मारहाण करत, शेतउपयोगी साहित्य जाळले

फळझाडे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी

           लऊळ(कटुसत्य वृत्त): शेतातील सामाईक बांध पेटवून दिल्याने बांधलगत ठेवलेले शेतउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना  ४ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भुताष्टे ता.माढा येथे घडली.

           सदर घटनेची फिर्याद माढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भुताष्टे येथील फिर्यादी सिद्धेश्वर चंद्रकांत कांबळे यांनी शेतीतील ड्रीपचे बंडल व सहाशे वेळू बांधलगत गोळा करून ठेवले होते.फिर्यादीचे शेजारी असलेले आरोपी विष्णू शिवाजी कांबळे यांनी दोघांमधील असलेला सामाईक बांध पेटवून देऊन त्यामध्ये सदर ड्रीपचे बंडल,सहाशे वेळू व पाच पेरूच्या झाडांचे नुकसान करत लथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.भा.दं.वि कलम 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माढा पोलीस करीत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments