Hot Posts

6/recent/ticker-posts

दिव्यांग व्यक्तीला आपुलकी प्रतिष्ठानने तीन चाकी सायकलची भेट देऊन जपली आपूलकी!

दिव्यांग व्यक्तीला आपुलकी प्रतिष्ठानने तीन चाकी सायकलची भेट देऊन जपली आपूलकी!

            सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला शहरातील एका दिव्यांग व्यक्तीला आपुलकी प्रतिष्ठानने तीन चाकी सायकलची भेट देऊन आपूलकी जोपासली आहे. खडतरे गल्ली येथील मारुती डांगे यांना गेल्या काही महिन्यांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता.त्यानंतर इच्छा असूनही ते सध्या घराबाहेर पडू शकत नाहीत . थोडासा सराव आणि प्रयत्न केल्यानंतर आपण तीनचाकी सायकलच्या आधाराने इकडेतिकडे फिरू शकू असा मनोदय व्यक्त करून आपुलकी प्रतिष्ठानकडे त्यांनी तीनचाकी सायकलची मागणी केली होती. आपुलकी प्रतिष्ठानच्या मदत समितीने पाहणी केल्यानंतर तीन चाकी सायकल देण्याचा निर्णय नुकताच झालेल्या बैठकीत घेतला होता. त्याप्रमाणे मारुती डांगे यांना बुधवारी छोटासा कार्यक्रम घेऊन ही तीनचाकी सायकल सांगोला रेल्वे स्टेशनचे अधीक्षक एस. एन. सिंह यांच्या हस्ते सुपूर्द केली. 

            यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, उपाध्यक्ष दिपक चोथे, सचिव संतोष महिमकर, सहसचिव शरणप्पा हळळीसागर, हरिभाऊ जगताप, अरविंद डोंबे, डॉ. मच्छिन्द्र सोनलकर, अरविंद केदार, इंजि. विकास देशपांडे, सुरेशकाका चौगुले, महादेव दिवटे, गोविंद माळी, अच्युत फुले, राजेंद्र दिवटे, अमर कुलकर्णी, विष्णुपंत केदार, राजेश भगवान खडतरे, या आपुलकी सदस्यांसह माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, संजय खडतरे, समाधान खाडे सर,साहेबराव शिंदे, पप्पू रामगडे, सुखदेव खडतरे, डॉ. सुधीर खाडे, ऍड. शशिकला खाडे, माजी उपनगराध्यक्षा मंगल खाडे, सौ. डांगे, भाऊसाहेब कांबळे, अक्काताई कांबळे, कमलाकर सूर्यवंशी, राहुल खडतरे व इतर नागरिक उपस्थित होते. समाजबांधवाला तीनचाकी सायकल दिल्याबद्दल अनिल खडतरे यांनी शेवटी आभार मानले.

            यावेळी रेल्वे स्टेशन अधीक्षक एस. एन. सिंह व राजेश भगवान खडतरे यांनी आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्यत्व स्विकारल्याबद्दल त्यांचे आपुलकी परिवारात स्वागत करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments