Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यातील स.म.गणपतराव साठे प्रशालेतील ५ विद्याथ्याॅची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी

माढ्यातील स.म.गणपतराव साठे प्रशालेतील ५  विद्याथ्याॅची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी

          माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील स.म.गणपतराव साठे जि.प.प्रशालेतील पाच विद्याथ्याॅची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघासाठी निवड झाली आहे.शिवतेज साठे,सार्थक कापसे, आनंद शिंदे,उदय भांगे,ओम माने अशी निवड झालेल्या  विद्याथ्याॅची नावे आहेत.

          महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन च्या वतीने नागपुर येथे  घेण्यात आलेल्या १४ वर्षाखालील मुलाच्या  राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करीत असताना या पाच विद्याथ्याॅनी चमकदार कामगिरी करीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.अजय नकार यांचे विद्याथ्याॅना मार्गदर्शन लाभले.विद्याथ्याॅचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

Reactions

Post a Comment

0 Comments