Hot Posts

6/recent/ticker-posts

आयआयटी बाॅम्बेच्या प्रवेश परीक्षेत शिवरत्न पॅटर्नचा यशराज गायकवाड चमकला

आयआयटी बाॅम्बेच्या प्रवेश परीक्षेत शिवरत्न पॅटर्नचा यशराज गायकवाड चमकला

              अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न पॅटर्न अकलूज मधील विद्यार्थी कु.यशराज संतोष गायकवाड याने देशातील नामांकित संस्था आय आय टी बाॅम्बे तर्फे घेतल्या जाणाऱ्या  इंजीनियरिंग मधील डिझाईनिंगच्या क्षेत्रातील UCEED या परीक्षेमध्ये ऑल इंडिया ३३१२ तर ऑल इंडिया शेड्युल कास्ट प्रवर्गात मध्ये १७६ वा रँक मिळवत उत्कृष्ट असे यश प्राप्त केले आहे.

              कु.यशराज संतोष गायकवाड याने प्राप्त केलेल्या यशाबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील व उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांनी  त्याचे व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.

              या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापन समिती सदस्य प्रिन्सिपल, समन्वयक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व पुढील यशस्वी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

              उच्च शिक्षणासाठी ज्या कही प्रवेश परीक्षा असतात त्या मध्ये प्रवेश परीक्षांमध्ये सहजरीत्या विद्यार्थ्यांना यश संपादन करावे मुलामुलींच्या करीअरला चांगली दिशा मिळावी म्हणून विद्यार्थांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरत्न पॅटर्नची सुरूवात केली होती.आज शिवरत्न पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरची चांगली दिशा मिळत आहे या बाबत आनंद होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments