Hot Posts

6/recent/ticker-posts

पालखी मार्ग, तळावर आवश्यक सुविधेसाठी नियोजन करावे - प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या सूचना

पालखी मार्ग, तळावर आवश्यक सुविधेसाठी नियोजन करावे - प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या सूचना


              पंढरपूर (कटुसत्य वृत्त): पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त  पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक येत असतात. पालखी सोहळ्यासह सोबत येणाऱ्या वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर व पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

              आषाढी यात्रा पूर्व तयारीबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोन करण्यात आले होते. या बैठकीला तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पोलीस निरिक्षक  अरुण पवार , धनंजय जाधव, मिलींद पाटील, उपकार्यकारी अभियंता डी.व्ही. मुखडे, भीमा कालवा मंडळाचे उपविभागीय अधिकारी  सुनिल चौगुले, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार तसेच  संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

              गुरव यांनी सांगितले की, यंदाची आषाढी वारी 10 जुलै 2022 रोजी भरणार असून,  या  आषाढी यात्रेसाठी मानाच्या पालख्यासह इतर संस्थानच्या पालख्या  पंढरपूरात येतात. येणाऱ्या पालखी सोहळ्यांना पालखी मार्गाबरोबरच पालखी तळावर कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी.  यासाठी पालखी मार्ग व पालखी तळावरील काटेरी झुडपे काढावीत, ज्या ठिकाणी अतिक्रमणे असतील ती तत्काळ काढावीत. पालखी रथाच्या उंचीच्या प्रमाणात इलेक्ट्रीक तारा व इतर अडथळे येणार नाहीत यासाठी पाहणी करुन तत्काळ कार्यवाही करावी. पालखी मार्गावर व पालखी तळांवर पाण्याचे स्रोत निश्चिती करावेत. पाण्याचे नमुने तपासणी करुन पाणी पिण्यास योग्य-अयोग्य याबाबतचे माहिती फलक लावावेत. तसेच पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था याबाबत नियोजन करावे. त्याचबरोबर स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा, अखंडीत वीज पुरवठा याबाबत दक्षता घ्यावी असेही श्री.गुरव यांनी सांगितले.

              नगरपालिका, भीमा कालवा मंडळ, पोलीस प्रशासन यांनी  संयुक्तपणे चंद्रभागा नदीवरील घाटांची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करुन  जाण्याचे व येणाचे मार्ग निश्चित करावेत, अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी दिल्या

Reactions

Post a Comment

0 Comments