आता महागाई दर व औषधोपचार खर्चावर मात
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिवसेंदिवस जगणे व औषधोपचाराचा खर्च महाग होत चालले आहे. या स्थितीत किमान दहा टक्क्यांपेक्षा अधिक परतावे देणारी बॅलेन्स ॲडव्हांटेज फंडचा पर्याय हा भक्कमपणे दोन्ही संकटांत उत्तम परताव्याचा पर्याय बनू लागला आहे. हा फंड स्वतः उत्तम पद्धतीने गुंतवणुकीचे पर्याय शोधून गुंतवणूकदारांना चांगले परतावे देत आहे.मागील काही वर्षांत महागाईचे फटके सातत्याने बसत आहेत. इंधन दरवाढीवर अवलंबून असलेला बाजार सातत्याने अन्नधान्य व इतर सेवांच्या बाबतीत महागडा होतो. रक्तदाब, मधुमेह, थॉयरॉईडसारखे आजार आता कॉमन होत चालले आहेत. त्यांच्या औषधांच्या किमती देखील वेळोवेळी वाढत आल्या आहेत. त्यावेळी केवळ ज्यांची अधिक परताव्याची गुंतवणूक आहे त्यालाच या संकटांना तोंड देता येते. अन्यथा, सोने मोडीत घालणे, मालमत्ता विकण्यासारखे पर्याय नकारात्मक अर्थकारण घडवून आणतात. त्यातून व्यक्तीला निराशेकडे जावे लागते.वाढत्या वयासोबत आता कॉमन आजारांच्या औषधोपचाराचा कायमचा खर्च जोडला गेला आहे. रक्तदाबाची गोळी जी दहा वर्षांपूर्वी २.८३ रुपये होती ती आता ७.८५ रुपये झाली आहे. हीच स्थिती अन्य कॉमन आजारांच्या बाबतीत झाली आहे. जेवणाची थाळी दहा वर्षांपूर्वी ५५ रुपयांना होती ती आता १५५ रुपये झाली आहे. प्रत्येकजण बाहेर जेवत नसला तरी त्याच्या आयुष्यात काही आनंदाच्या क्षणात त्याला हा खर्च करावा लागतो.या स्थितीत सोने, एफडी व विमा योजनांचे पर्याय १० टक्क्यांपेक्षा कमी परतावा देतात. सोन्याच्या गुंतवणुकीचे परतावे ८ टक्क्यांवर गेलेले नाहीत.
0 Comments