Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

               सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- सोलापूर वन विभाग, सोलापूर महानगरपालिका,  केंद्रीय माहिती व प्रसार मंत्रालय  व वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 5 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिन सिध्देश्वर वनविहार, सोलापूर येथे साजरा करण्यात येणार आहे. 

               पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.  सकाळी 6 ते 7 वाजता पक्षी निरीक्षण कार्यक्रम, 7 ते 8 वाजता सीड बॉल तयार करणेची कार्यशाळा, 8 ते 9 वाजता वृक्षारोपन  व वृक्षलागवड कार्यशाळा होणार असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments