बेंबळे ग्रा.पं.च्या प्रभाग 5 मधील महिलेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर

13 मेपासून अर्ज भरणे ; 5 जून रोजी मतदान
बेंबळे (कटुसत्य वृत्त): बेंबळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग 5 मधील सर्वसाधारण महिलेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून 5 जून 22 रोजी मतदान होणार असल्याची अधिसूचना जारी झाली आहे.
वृत्तांत असा की बेंबळे ग्रामपंचायत साठी पाच प्रभाग असून एकूण पंधरा सदस्य आहेत. यातील प्रभाग 5 मधील सर्वसाधारण महिलेच्या जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्या मंजुषा मारुती काळे यांनी चार महिन्यापूर्वी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असल्यामुळे सध्या या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. या कार्यक्रमानुसार पाच मे 22 रोजी प्रभाग 5 साठी असलेल्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शुक्रवार दिनांक 13 मे 22 पासून ते शुक्रवार दिनांक 20 मे 22 पर्यंत तहसील कार्यालय माढा येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र (अर्ज) स्वीकारण्यात येणार आहेत. सोमवार दिनांक 23 मे 22 रोजी अकरा वाजले पासून अर्जाची छाननी होणार आहे. बुधवार दिनांक 25 मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज परत माघारी घेण्याची मुदत असुन याच दिवशी दुपारी तीन नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहेत. निवडणूक लागल्यास रविवार दिनांक 5 जून 22 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे व सोमवार दिनांक सहा जून रोजी तहसील कार्यालय माढा येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
बेंबळे मंडल अधिकारी जी.के. सोनवणे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून बेंबळे गावचे तलाठी डी .डी. करळे हे त्यांना सहकार्य करत आहेत .
0 Comments