Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवाजी पॉलिटेक्निकच्या ३० विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड

शिवाजी पॉलिटेक्निकच्या ३० विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड

             सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमधील शैक्षणिक वर्ष 2021-2022 मधील 30 विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाली आहे अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. एस. डी बावचे, प्रा.    पी.ए.लेंडवे व कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांनी दिली. व्हेरॉक  इंडिया  प्रायव्हेट  इंजीनियरिंग लिमिटेड पुणे  या कंपनीमध्ये  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग या  विभागातील 24  विद्यार्थ्यांची  तर  के.एस.पी.जी. .ऑटोमोटिव पुणे  या कंपनीत  मेकॅनिकल  इंजीनियरिंग विभागातील 6 विद्यार्थ्यांची थेट मुलाखती द्वारे निवड झाली आहे.  वरील कंपन्यांनी  अनुक्रमे    अकलूज  व पंढरपूर  येथे आयोजित केलेल्या  पुल  कॅम्पस  मध्ये  या विद्यार्थ्यांची  शैक्षणिक गुणवत्ता,  तांत्रिक कौशल्य,  व्यक्तिमत्व  यांचा सारासार विचार करून या विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

             शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता दिले जाणारे लक्ष, शिस्त, दत्तक पालक योजना, आणि प्लेसमेंटसाठी करून घेतली जाणारी विशेष तयारी यामुळे या कॉलेजमधील विद्यार्थी नेहमीच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवडले जात असतात. प्लेसमेंट साठी जिल्ह्यात नेहमीच अग्रेसर असलेले शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज नेहमीच उत्कृष्ट निकाल, प्लेसमेंट, शिस्त, आणि संस्कार यासाठी विद्यार्थी व पालक यांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये असणारे अनुभवी शिक्षक, सर्व साहित्यांनी सुसज्ज प्रयोगशाळा, वर्कशॉप, लैंग्वेज लॅब, सुसज्ज ग्रंथालय व एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वर दिला जाणारा भर यामुळे या कॉलेजमधून बाहेर पडणारे विद्यार्थी हे इंडस्ट्री रेडी म्हणूनच बाहेर पडतात व देश-विदेशातील नामवंत कंपन्यांमध्ये त्यांची निवड होते. पदविका अभ्यासक्रम   पूर्ण करण्यापूर्वीच  म्हणजे अंतिम वर्षात असतानाच  विद्यार्थ्यांची या नामवंत कंपन्यांमध्ये झालेली निवड यामुळे  विद्यार्थी व पालक वर्ग यामधून समाधान व्यक्त केले जात आहे. निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री. बी. आर. गायकवाड, संस्थेचे ,सचिव श्री. ए. आर. गायकवाड,ज्येष्ठ विश्वस्त व मार्गदर्शक श्री. एम. आर. गायकवाड. प्राचार्य. श्री. आर. ए. देशमुख उपप्राचार्य  श्री. व्ही. एम. गायकवाड,  मार्गदर्शिका सौ. माधुरी गायकवाड सर्व विभाग प्रमुख, शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments